नाशिक: शहरासह पिंपरी चिंचवड, भोसरी भागातून दुचाकी चोरी करणाऱ्या दोन संशयित चोरांकडून पोलिसांनी साडेपाच लाखहून अधिक किंमतीच्या आठ मोटारसायकली हस्तगत केल्या. या कारवाईतून मोटारसायकल चोरीचे आठ गुन्हे उघडकीस आले. शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनने ही कामगिरी केली.

शहरात मोटारसायकल चोरीचे प्रकार वाढत आहेत. या संदर्भात मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने योगेश दाभाडे (२३, रा. वळसाने तासानी, धुळे, हल्ली चाकण, पुणे) आणि नीलेश चव्हाण (२३, नागाव, जळगाव, हल्ली, भोसरी, पुणे) यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत संशयितांनी नाशिक शहर तसेच पिंपरी चिंचवड परिसरातून मोटारसायकल चोरी केल्याचे निष्पन्न झाले. या कारवाईत उपरोक्त भागातील आठ दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आले.

kirit love jihad case
मुंबईत टॅक्सी चालकाकडून तरुणीची हत्या, किरीट सोमय्यांनी केला ‘लव्ह जिहाद’चा आरोप
Pune, Father to Kill Son, Construction developer s Murder Attempt , Family Feud, crime in pune, pune murder planning, pune news, marathi news, murder plan in pune, firing in pune,
पुणे : कौटुंबिक वादातून वडिलांनीच दिली मुलाची सुपारी, जंगली महाराज रस्त्यावरील गोळीबाराचा उलगडा
Thane municipal corporation, commissioner, action against illegal construction, Thane
ठाण्यात बेकायदा बांधकामांवर हातोडा
police committed suicide
खडक पोलीस ठाण्यात पोलीस शिपायाची बंदुकीतून गोळी झाडून आत्महत्या

हेही वाचा… ठाकरेंच्या नाशिकमधील शिलेदाराला अटक, संजय राऊतांचा भाजपा, दादा भुसे अन् सरकारवर हल्लाबोल; म्हणाले…

संशयितांकडून पाच लाख ६० हजार रुपये किंमतीच्या पाच लाख ६० हजार रुपयांच्या आठ मोटारसायकल हस्तगत करण्यात आल्या. यात मुंबई नाका पोलीस ठाणे, सातपूर पोलीस ठाण्यासह पिंपरी चिंचवड भागातील म्हाळुंगी एमआयडीसी, भोसरी पोलीस ठाण्यातील चार, दिघी पोलीस ठाण्यात दाखल असणाऱ्या दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांतील वाहने जप्त करण्यात आली. संशयित आणि ताब्यात घेतलेल्या दुचाकी पुढील कार्यवाहीसाठी संबधित पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आल्या आहेत. ही कामगिरी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, उपायुक्त (गुन्हे शाखा) प्रशांत बच्छाव, सहायक आयुक्त डॉ. सिताराम कोल्हे. निरीक्षक विजय ढमाळ, रणजित मलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.