स्व. रामकृष्ण जगदाळे फाऊंडेशन, महाराष्ट्र क्रिकेट संघटना आणि नाशिक बार असोसिएशनच्या सहकार्याने आयोजित वकिलांच्या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेत पुणे संघाने अंतिम सामन्यात विजय मिळविला. हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर झालेल्या या चुरशीच्या सामन्यात ठाणे संघ पराभूत झाला. ठाणे संघाने प्रथम फलंदाजी स्वीकारताना २० षटकांत १५५ धावा केल्या. पुण्याने अवघ्या १८व्या षटकात हे आव्हान पार पाडून विजयानंतर शिक्कामोर्तब केले. सामनावीरचा मानकरी ठाण्याच्या जयराज गौडने पटकावला.
सवरेत्कृष्ट गोलंदाजचा किताब परभणीचा अल्ताफ शेख, सवरेत्कृष्ट फलंदाज अहमदनगरचा अजय शितोळे आणि मालिकावीरचा किताब इरफान शेख याने पटकाविला. स्पर्धेचे पारितोषिक वितरण जगदाळे फाऊंडेशनचे अध्यक्ष अ‍ॅड. विवेकानंद जगदाळे, नाशिक बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. नितीन ठाकरे, अ‍ॅड. विलास लोणारी, अ‍ॅड. दौलतराव घुमरे यांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धेत विविध जिल्ह्य़ांतील १०३ संघ सहभागी झाले. शहरातील २० मैदानांवर एकूण १२७ सामने झाले. स्पर्धेत सुमारे १५०० वकील खेळाडू सहभागी झाले.