जळगाव – वीज देयकाचा तपशील तसेच वीजपुरवठा बंद असण्याचा कालावधी व इतर माहिती लघुसंदेशाद्वारे मिळविण्यासाठी जळगाव परिमंडळातील ९० टक्के ग्राहकांनी महावितरणकडे भ्रमणध्वनी क्रमांक नोंदविला आहे. नव्याने नोंदणीसाठी तसेच आधी नोंदविलेला क्रमांक बदलण्यासाठी महावितरणशी संपर्क साधून वीजग्राहकांनी या सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्य अभियंता कैलास हुमणे यांनी केले आहे.

जळगाव परिमंडळातील १६ लाख ३१ हजार ६१९ पैकी १४ लाख ७८ हजार ४८० ग्राहकांनी महावितरणकडे भ्रमणध्वनी क्रमांक नोंदविला आहे. यात घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व इतर या वर्गवारीतील १२ लाख ६२ हजार ७३५ पैकी ११ लाख ३० हजार ४०७ ग्राहकांचा, तर कृषिपंप वर्गवारीतील तीन लाख ६८ हजार ८८४ पैकी तीन लाख ४८ हजार ७३ ग्राहकांचा समावेश आहे. जळगाव मंडळात नऊ लाख ७७ हजार ७४ पैकी नऊ लाख सहा हजार ४४६ ग्राहकांनी, धुळे मंडळात चार लाख ३७ हजार २२७ पैकी तीन लाख ९६ हजार ४६२ ग्राहकांनी, तर नंदुरबार मंडळात दोन लाख १७ हजार ३१८ पैकी एक लाख ७५ हजार ५७२ ग्राहकांनी महावितरणकडे भ्रमणध्वनी क्रमांक नोंदवला आहे.

Black market, pune RTO, brokers,
पुणे आरटीओत ‘काळाबाजार’! दलालांनी उभारली पर्यायी यंत्रणा; कर्मचाऱ्यांना धमकावण्याचे प्रकार
Megha Engineering, Eight tenders,
एमएसआरडीसीच्या दोन प्रकल्पांसाठी मेघा इंजिनिअरिंगच्या आठ निविदा, निवडणूक रोखे खरेदीतील दुसऱ्या क्रमांकाची कंपनी
UPSC Recruitment for 147 Post Apply Online Candidates can check the notification online application link and salary
UPSC Recruitment 2024: यूपीएससी अंतर्गत ‘या’ १४७ पदांसाठी होणार भरती; २ लाखांपर्यंत मिळेल पगार, जाणून घ्या सविस्तर
High rate of gold prices in the domestic market
सोन्याचा सार्वकालिक उच्चांक; मुंबईत तोळ्यामागे घाऊक भाव ७०,४७० रुपयांवर

हेही वाचा >>>तीन वर्षांतील टक्केवारी विचारात घेऊन उन्हाळी परीक्षांचा निकाल

या ग्राहकांना वीज देयकाची माहिती, तांत्रिक बिघाड किंवा नियोजित देखभाल- दुरुस्तीमुळे वाहिनीवरील बंद असलेला वीजपुरवठा पूर्ववत होण्याचा कालावधी, मीटर रीडिंग, देयक भरण्याची अंतिम तारीख ही माहिती लघुसंदेशाद्वारे (एसएमएस) पाठविण्यात येत आहे. ज्या ग्राहकांना भ्रमणध्वनी क्रमांक बदलायचा आहे, तसेच ज्यांना नव्याने क्रमांक नोंदवायचा आहे, त्यांनी २४ तास सुरू असणार्या १९१२ किंवा १८००-२१२-३४३५ किंवा १८००-२३३-३४३५ या टोल फ्री क्रमांकांवर अथवा संकेतस्थळावर किंवा महावितरण ॲपवर नोंदणी करावी. वीज देयकाचा तपशील व इतर माहिती मिळविण्यासाठी ग्राहकांनी भ्रमणध्वनी क्रमांक नोंदविण्याचे आवाहन मुख्य अभियंता कैलास हुमणे यांनी केले आहे.