मृतांमध्ये मीरारोडच्या चार भाविकांचा समावेश

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सिन्नर-शिर्डी महामार्गावर शनिवारी सायंकाळी इनोव्हा आणि खासगी प्रवासी बस यांच्यात टक्कर होऊन झालेल्या भीषण अपघातात पाच जण ठार झाले. मृतांमधील चारजण मीरारोडचे असून, एकजण कांदिवलीचा असल्याचे समजते. अपघातात दहा वर्षांची मुलगी गंभीर जखमी झाली.

महामार्गावरील देवपूर फाटय़ाजवळ सायंकाळी साडेसहा वाजता हा अपघात झाला. शिर्डी येथे साईदर्शनानंतर भाविक इनोव्हाने मुंबईकडे परतत होते. सिन्नरकडून येणाऱ्या खासगी प्रवासी बसने त्यांच्या मोटारीला जोरदार धडक दिली. अपघातात इनोव्हातील निलेश जोशी, पवनाज जोशी (१२), उदय वराळे, ऋषी वराळे (१३) आणि अजमेल चक्रवर्ती यांचा मृत्यू झाला. पवनी जोशी (१०) हिच्यावर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, तिची प्रकृती गंभीर आहे.

 

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Road accident at shirdi
First published on: 11-11-2018 at 00:41 IST