जिजाई थिएटर्सच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय बालनाटय़ स्पर्धेत येथील र. ज. चौहान गर्ल्स हायस्कूलची ‘परिवर्तन’ ही एकांकिका सहभागी १४ एकांकिकांमध्ये अव्वल ठरली. या एकांकिकेस प्रथम क्रमांकासाठी १० हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह देण्यात आले. एकांकिकेतील ‘सगुणा’ ही भूमिका करणाऱ्या समृद्धी जोशी हिस उत्कृष्ट अभिनयाचे पारितोषिक मिळाले. लेखन व दिग्दर्शन गौरी काळे यांनी केले. रंगभूषा कामिनी पवार, पूनम चव्हाण यांनी, वेशभूषा कल्पना गावंडे, सुरेखा पगारे, सुनंदा जाधव, सुषमा वानखेडे यांनी केली. संगीत संयोजन आरती कुलकर्णी, सुजाता कोपरकर, प्राची सराफ यांनी पाहिले.
संग्रहित लेख, दिनांक 22nd Feb 2016 रोजी प्रकाशित
राज्यस्तरीय बालनाटय़ स्पर्धेत ‘परिवर्तन’ प्रथम
जिजाई थिएटर्सच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय बालनाटय़ स्पर्धेत येथील र. ज. चौहान गर्ल्स हायस्कूलची ‘परिवर्तन’
Written by मंदार गुरव

First published on: 22-02-2016 at 00:48 IST
Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: State level child drama competition parivartan