खासदार हेमंत गोडसे यांच्या पाठपुराव्याला यश

नाशिक : अंजनेरी- ब्रम्हगिरी दरम्यान रोप वे तयार करण्यासाठी केंद्र सरकारने प्रकल्पाचा सविस्तर अहवाल तयार करण्याकामी सर्वेक्षणासाठी आदेश काढले आहेत. या निर्णयामुळे रोप वेचा  सविस्तर प्रकल्प अहवाल लवकरच तयार होणार असल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली. त्र्यंबकेश्वर हे बारा ज्योर्तििलगापैकी एक असून दर बारा वर्षांनी याठिकाणी कुंभमेळा भरतो. परिसरात कुशावर्त आणि संत निवृत्तीनाथ समाधी मंदिर असून नारायण नागबली हा विधी देशभरात फक्त त्र्यंबकेश्वर येथेच होत असल्याने देशभरातून भाविक पूजेसाठी येत असतात. या परिसरात अंजनेरी आणि ब्रम्हगिरी ही ऐतिहासिक स्थळे असून आजूबाजूचा संपूर्ण परिसर हा घनदाट जंगलाचा आहे.

प्रस्तावित रोप वे प्रकल्पाचे सर्वेक्षण करण्याकामी सविस्तर अहवाल तयार करण्यासाठी नुकतेच केंद्र सरकारने सल्ला संस्था नेमण्याचा निर्णय घेतला आहे. प्रक्रिया पार पडताच प्रस्तावित रोपवे प्रकल्पाच्या सर्वेक्षणाचे काम सुरू होणार असल्याची माहिती गोडसे यांनी दिली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अंजनेरी आणि ब्रम्हगिरी या  पर्वतांवर जाण्यासाठी पायाभूत सुविधा नसल्याने बहुतांश भाविकांना या पर्वतांवर जाणे शक्य होत नाही. याठिकाणी रोप वे झाल्यास पर्यटक तसेच भाविक अंजनेरी आणि ब्रम्हगिरी या पवित्र स्थळांना निश्चितच भेट देवू शकतात, या विचारातून रोप वे उभारण्यासाठी दोन वर्षांपासून खासदार गोडसे यांनी पाठपुरावा सुरु केला होता.