विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या तरुणाईच्या कागगिरीला पोचपावती
नाशिक : ‘बदलाची सुरुवात आपल्यापासूनच’ असे म्हणत खऱ्या अर्थाने समाज ‘घडवण्यासाठी’ धडपडणाऱ्या तरुणाईची दखल ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ या पुरस्काराद्वारे घेतली जाते. गेल्या दोन वर्षांत या उपक्रमांतर्गत २६ तरुण ऊर्जावंतांचा गौरव करण्यात आला. त्यामध्ये अनाथ, अपंगांसाठी धडपडणारे, कायद्याच्या माध्यमातून जनआंदोलनाचा आधार ठरणारे, तृतीयपंथीयांचा आधार होणारे, विज्ञान-तंत्रज्ञान, आरोग्य, कला अशा अनेकविध क्षेत्रांत काम करणाऱ्या तरुणाईचा समावेश होता. त्यातीलच एक म्हणजे बुद्धिबळपटू विदित गुजराती..
प्रवेश अर्ज कसा भराल?
या पर्वाच्या निवड प्रक्रियेचे तपशील https://taruntejankit.loksatta.com येथे पाहायला मिळतील. या ठिकाणी असलेली प्रवेश पत्रिका ऑनलाइन भरून पाठवणे अनिवार्य आहे. त्याचबरोबर आपल्या भवताली दिसणाऱ्या गुणवंत तरुणांची नावे माहितीसह सुचवताही येणार आहे.
प्रायोजक
गुणवंत तरुणाईच्या गौरवाचा हा सोहळा ‘केसरी टूर्स’ पुरस्कृत आहे. सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँक या उपक्रमाचे सहप्रायोजक आहेत, तर ‘एम. के. घारे ज्वेलर्स’ ‘पॉवर्ड बाय’ पार्टनर आहेत. उपक्रमाचे टेलिव्हिजन पार्टनर ‘एबीपी माझा’ आहे. या उपक्रमाचे ‘नॉलेज पार्टनर’, ‘पीडब्ल्यूसी’ आहेत.
‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ हा पुरस्कार युवा वर्गासाठी विशेषत: कला, क्रीडा, संस्कृती अशा वेगवेगळ्या क्षेत्रांत काम करणारे युवा कलाकार, खेळाडूंसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे. पुरस्कारामुळे युवा वर्गाला नवचैतन्य मिळत असून कामासाठी प्रेरणा मिळत आहे. नुकतेच स्वित्र्झलड येथे झालेल्या बील ओपन स्पर्धेत मला यश मिळाले. सद्य:स्थितीत बुद्धिबळामध्ये माझा भारतात दुसरा आणि जागतिक पातळीवर २८ वा क्रमांक आहे. तरुण तेजांकित पुरस्कार मिळाल्यानंतर आनंद तर झालाच, पण जबाबदारीही वाढली. माझ्या प्रयत्नांना यश मिळण्यासाठी या पुरस्काररूपी कौतुकाचा नक्कीच वाटा आहे. या पुरस्कारानंतर मला वेगवेगळे पुरस्कार, सन्मान प्राप्त झाले; परंतु तरुण तेजांकितचे महत्त्व विशेष आहे. – विदित गुजराती, बुद्धिबळपटू (लोकसत्ता तरुण तेजांकित २०१९, विजेता)