घोटी टोल नाक्यावर नायब तहसीलदाराला लुटले

रोख रकमेसह मोबाईल चोरीस

loksatta, marathi news paper, news paper, news online, marathi news, marathi news online, newspaper, news, latest news in marathi, current news in marathi,sport news in marathi, bollywood news in marathi girl tried to commit suicide depression college girl suicide try
मोशीत गळफास घेऊन महिलेनं जीवनयात्रा संपवली.

जळगावहून मुंबईला जाणारे नायब तहसीलदार घोटी टोल नाक्यावर विश्रांतीसाठी थांबले असता, अज्ञात चोरट्याने बेसावधपणाचा फायदा घेऊन त्यांच्या वाहनातील रोख रक्कम व मोबाईल असा एकूण ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. घोटी पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव येथील नायब तहसीलदार विकास प्रल्हाद लाडवंजारी हे आपल्या खासगी कामानिमित्त जळगावहून मुंबईला जात होते. शुक्रवारी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास थकव्यामुळे ते घोटी टोल नाक्यावर थांबले. रस्तालगत वाहन उभे करून ते वाहनातच झोपले. अज्ञात चोरट्यानी याचा फायदा घेत वाहनातून हा मुद्देमाल लंपास केला. दरम्यान, याबाबत घोटी पोलीस ठाण्यात त्यांनी तक्रार दाखल केली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नाशिक बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Tehsildar looted ghoti nashik jalgaon cash crime nashik crime jalgaon crime

ताज्या बातम्या