जळगाव : महापालिकेच्या आयुक्तांच्या खुर्चीवर हक्क कुणाचा, याचा निर्णय पुन्हा लांबणीवर पडला आहे. याबाबतचा निर्णय बुधवारी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधीकरणात (मॅट) होणार होता. मात्र, न्यायाधीशांना अपघात झाल्यामुळे सुनावणी लांबणीवर पडली असून, आता १३ जानेवारीला दुपारी तीन वाजता सुनावणी होणार आहे.

 महापालिकेच्या इतिहासात प्रथमच आयुक्तपदाचा तिढा निर्माण झाला आहे. सध्या महापालिकेच्या आयुक्तपदाचा सुरू असलेला वाद सुटण्याची चिन्हे दिसत नाहीत. कार्यकाळ पूर्ण झाला नाही आणि कोणतेही सबळ कारण न देता अचानक बदली झाली कशी, म्हणून बदलीविरोधात डॉ. विद्या गायकवाड यांनी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधीकरणात याचिका दाखल केली आहे.

tankers, Tanker inspection drive,
टॅंकरच्या बेदरकारपणाला आवर, अपघात दुर्घटनेनंतर वाहतूक विभागाकडून टॅंकर तपासणी मोहीम
Tesla chief, Elon Musk, electric car, investment, india
‘टेस्ला’कडून भारतात २ ते ३ अब्ज डॉलरची गुंतवणूक? एलॉन मस्क यांच्या दौऱ्यादरम्यान घोषणा होण्याचा अंदाज
Mumbai, nursery,
मुंबई : उच्च न्यायालयातील पाळणाघराला अखेर न्याय
Rashmi Barve
रश्मी बर्वे प्रकरणावर बुधवारी सुनावणी, जातवैधता प्रमाणपत्रामुळे निवडणूक अर्ज रद्द

दरम्यान, दीड महिन्यापासून महापालिकेत आयुक्तपदाच्या खुर्चीवरून राजकीय हस्तक्षेप वाढल्याने वाद सुरू आहेत. महापालिकेत सध्या दोन आयुक्त आहेत. यात पवार आणि डॉ. गायकवाड यांच्याकडे कायदेशीर कारभार आहे. मात्र, यातही त्यांना धोरणात्मक कागदपत्रांवर स्वाक्षरी न करण्याबाबत निर्देशही देण्यात आले आहेत. त्यामुळे महापालिकेच्या कारभाराला खीळ बसली आहे. नियमित आयुक्तपदाची नियुक्ती झाल्यानंतरच प्रशासकीय कामकाज सुरळीत होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या सर्व घडामोडींमुळे शहराच्या विकासावर परिणाम होत आहे. आयुक्त डॉ. गायकवाड या जळगावमध्ये असून, पवार हेही आयुक्तपदावर कायम आहेत.