शहरात वाहन चोरीचा आलेख दिवसागणिक उंचावत असून दुचाकीनंतर चोरांनी आता मालमोटारीकडेही लक्ष वळवले आहे. टाकळी परिसरात २५ टन सळईने भरलेली मालमोटार चोरण्यात आली. वेगवेगळ्या भागातून तीन दुचाकींची चोरी झाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>>नाशिक: कार्डधारित अपंगांना प्रवास मोफत पण, तिकीट काढणे बंधनकारक; सिटीलिंक प्रशासनाचा निर्णय

शहरात दुचाकी चोरीच्या घटना अव्याहतपणे घडत आहेत. त्यात आता मालमोटारीचीही भर पडल्याचे चित्र आहे. मालमोटार चोरीबाबत टाकळी येथील वाल्मिक इपरदास यांनी तक्रार दिली. मालमोटारीत २५ टन सळई भरलेली होती. ग्राहकाकडे माल पोहोचवण्यासाठी ते सकाळी जाणार होते. त्यामुळे रात्री त्यांनी आपली मालमोटार रामदास स्वामी पूल परिसरातील रस्त्यालगत उभी केली होती. चोरट्यांनी लोखंडासह मालमोटार असा ४० लाख रुपये किंमतीचा माल लंपास केला. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा >>>नाशिक: रोहित पवार यांनी अभ्यास करावा – छगन भुजबळ यांचा सल्ला

मोटारसायकल चोरीची पहिली घटना अमृतधाम परिसरातील सरस्वतीनगरमध्ये घडली. याबाबत रवींद्र परदेशी यांनी तक्रार दिली. घरासमोर उभी केलेली त्यांची दुचाकी रात्री चोरट्यांनी चोरून नेली. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरी घटना मेनरोड भागात घडली. या बाबत राहूल गांगुर्डे यांनी तक्रार दिली. या युवकाने विश्रामबाग संकुलात उभी केलेली दुचाकी चोरण्यात आली. या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिसऱ्या घटनेत पळसे येथील एसटी कॉलनीत वास्तव्यास असणाऱ्या विद्या मोजाड यांची घरासमोर उभी केलेली दुचाकी चोरट्यांनी लंपास केली. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Theft of a freight car with 25 tons of iron amy
First published on: 29-11-2022 at 20:33 IST