नाशिक: रोहित पवार यांनी अभ्यास करावा - छगन भुजबळ यांचा सल्ला | Rohit Pawar should study Chhagan Bhujbal advice amy 95 | Loksatta

नाशिक: रोहित पवार यांनी अभ्यास करावा – छगन भुजबळ यांचा सल्ला

आमदार रोहित पवार यांनी अभ्यास करावा, त्यांचे आजोबा, पणजोबा हे सर्व सत्यशोधक समाजाच्या मुशीतून तयार झालेले आहेत.

Chagan-bhujbal
( छगन भुजबळ )

आमदार रोहित पवार यांनी अभ्यास करावा, त्यांचे आजोबा, पणजोबा हे सर्व सत्यशोधक समाजाच्या मुशीतून तयार झालेले आहेत. रोहित पवार भेटल्यास त्यांना सर्वकाही समजावून सांगणार, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तथा माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी येथे व्यक्त केली.
महात्मा जोतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त सोमवारी पुणे येथे अखिल भारतीय समता परिषदेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात भुजबळ यांनी सरस्वतीदेवी पूजनाविषयी केलेल्या विधानावर ब्राम्हणवादी संघटनांनी आक्षेप घेतला आहे. यासंदर्भात रोहित पवार यांनीही देवी-देवतांचा अवमान होणार नाही, याची प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक असल्याची प्रतिक्रिया नाशिक दौऱ्यावर असताना व्यक्त केली होती. यासंदर्भात भुजबळ यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सरस्वती पूजेसंदर्भातील विधान, त्यासंदर्भातील वाद, रोहित पवार यांची प्रतिक्रिया याविषयी उत्तरे दिली.

हेही वाचा >>>सीमा वादात कर्नाटकी कावा लक्षात घ्या; छगन भुजबळ यांचा महाराष्ट्र सरकारला सल्ला

शिक्षणाची कवाडे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी खुली केल्यामुळे ब्राह्मण भगिनींनाही शिकता आले. ब्राह्मण विचारवंत पुढे आले. त्यामुळेत महिला शिक्षण सुरू झाले, असे भुजबळ यांनी सांगितले.सरस्वतीविषयी आपण अपशब्द काढलेले नाहीत. सरस्वतीच्या पूजेला आपला विरोध नाही. ही पूजा केवळ घरात करावी, असे त्यांनी सांगितले. फुले यांच्यासोबत ब्राह्मण होते म्हणूनच महिला शिक्षण सुरू झाले. पुण्यात भिडे यांनी वाडा दिल्यावरच शाळा सुरू झाली. पहिल्या सहा मुली या ब्राह्मणच होत्या. चिपळूण येथेही भांडारकर त्यांच्यासोबत होते. मुलींचे शिक्षण सुरू राहण्यासाठी कोल्हापूरहून छत्रपती शाहू महाराज, अण्णासाहेब कर्वे या सर्वांनी महिला शिक्षणासाठी पुढाकार घेतला. सरस्वती देवीची पूजा करण्यापेक्षा शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले, महात्मा फुले, भाऊराव पाटील यांची पूजा करा. जे वाटतं ते सांगण्याचा आपणास अधिकार आहे, असे भुजबळ यांनी नमूद केले.

मराठीतील सर्व नाशिक / उत्तर महाराष्ट्र ( Nashik ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-11-2022 at 19:54 IST
Next Story
सीमा वादात कर्नाटकी कावा लक्षात घ्या; छगन भुजबळ यांचा महाराष्ट्र सरकारला सल्ला