१०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेत आजपर्यंत अडीच हजारहून अधिक बाळांचा जन्म

आरोग्य सेवा तळागाळापर्यंत पोहचविण्यासाठी आरोग्य विभाग प्रयत्नशील आहे.

दोन लाखांपेक्षा अधिक रुग्णांना लाभ

नाशिक : आरोग्य सेवा तळागाळापर्यंत पोहचविण्यासाठी आरोग्य विभाग प्रयत्नशील आहे. आरोग्य सेवा गरजूंना तातडीने मिळावी यासाठी २०१४ मध्ये १०८ क्रमांकांची रुग्णवाहिका सुरू करण्यात आली. रुग्ण तिथे रुग्णवाहिका असे या रुग्णवाहिके चे स्वरूप आहे. जिल्ह्य़ात आतापर्यंत या १०९ क्र मांकाच्या रुग्णवाहिके चा दोन लाख ४८ हजार १६९ रुग्णांनी लाभ घेतला आहे. विशेष म्हणजे दोन हजार ७३१ बालकांचा जन्म रुग्णवाहिके तच झाला असून २१४ अत्यावस्थ रुग्णांना या रुग्णवाहिके मुळे जीवनदान मिळाले आहे.

आर्थिकदृष्टया दुर्बल घटक आरोग्य सेवेपासून वंचित राहू नये यासाठी आरोग्य विभाग वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून जास्तीतजास्त रुग्णांपर्यंत आरोग्य सेवा पोहचविण्यासाठी प्रयत्न करत आहे. या अंतर्गत २०१४ मध्ये १०८ क्र मांक रुग्णवाहिका ही संकल्पना मांडण्यात आली. जिल्ह्य़ात ४६ रुग्णवाहिकांच्या माध्यमातून सर्व तालुक्यांमध्ये रुग्णांना रुग्णालयापर्यंत पोहचविण्यात येत आहे. अपघात, प्रसूतीपूर्व, प्रसूतीकाळ, प्रसूतीपश्चात, हृदयरोग, जळीत, आपत्ती अशा वेगवेगळ्या कारणांसाठी ही सेवा दिली जात आहे.

करोना काळात या सेवेच्या माध्यमातून करोनाग्रस्त रुग्णांची ने-आण मोठय़ा प्रमाणावर झाली. करोना लाटेत आतापर्यंत २१,८३६ रुग्णांनी या सेवेचा लाभ घेतल्याची माहिती रुग्णवाहिके चे विभागीय व्यवस्थापक डॉ. अश्विन राघमवार यांनी दिली.

रस्त्यांवरील वाहन अपघातात ३०,६८७ रुग्ण, जळीत एक हजार २१८, हृदयविकाराचा झटका आलेले ६०२, उंचावरून पडल्यामुळे ५५८७, विषबाधेसाठी ९३०४ तसेच प्रसुती काळात महिलांनी या सेवेचा सर्वाधिक लाभ घेतला.

ही संख्या ७९,३२४ पर्यंत पोहचली आहे. विजेचा धक्का तसेच आकाशातील वीज कोसळल्याने २८२, मोठय़ा प्रमाणावरील अपघातात एक हजार २१९, वैद्यकीय ८७,१७६ आणि इतर काही कारणांमुळे २७,७४१, हाडांची दुखापत ३७६, आत्महत्या तसेच आत्महत्येचा प्रयत्न २१८ रुग्णांना या रुग्णवाहिकेद्वारे आरोग्य सेवा दिली गेली. प्रसूती काळात या सेवेचा लाभ गरोदर मातांकडून घेतला जातो. करोनामुळे वाहतुकीवर निर्बंध असताना तसेच दुर्गम भागात वाहतुकीचा प्रश्न कायम असताना ही सेवा महिलांसाठी फायदेशीर ठरली. पेठ, हरसूल, त्र्यंबक, सुरगाण्यासह अन्य तालुक्यातून या सेवेचा लाभ घेत असताना दोन हजार ७३१ महिलांनी रुग्णवाहिके तच बाळांना जन्म दिला. दुसरीकडे व्हेंटिलेटरच्या सहाय्याने २१४ रुग्ण रुग्णालयांपर्यंत व्यवस्थित पोहचविण्यात आले.

१०८ क्र मांकाच्या रुग्णवाहिके ला मिळणारा प्रतिसाद पाहता जास्तीतजास्त रुग्णांपर्यंत ही सेवा पोहचावी यासाठी आरोग्य विभाग प्रयत्न करत आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नाशिक बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Till date two and a half thousand babies been born ambulance number 108 ssh

Next Story
नाशिकच्या गुंडास धुळ्यात अटक
ताज्या बातम्या