शहरातील विविध भागांना जोडणारा, पण वाहतूक कोंडीमुळे सर्वाची डोकेदुखी ठरलेल्या द्वारका चौकात पोलिसांनी पुन्हा नव्या प्रयोगाद्वारे तोडगा काढण्याची धडपड चालविली आहे. त्या अनुषंगाने या चौकातील सव्‍‌र्हिस रोडवरील सहा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे. तसेच दोन्ही सव्‍‌र्हिस रोड हे एकेरी करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शहरातून जाणाऱ्या मुंबई-आग्रा महामार्गावरील द्वारका हा मध्यवर्ती चौक. नाशिक-पुणे रस्त्यासह शहरातील विविध भागांना जोडणारा हा मुख्य चौक आहे. सर्व बाजूने वाहनांचा मोठा ओघ असल्याने वाहतूक कोंडी ही नित्याची बाब. महामार्गाच्या विस्तारीकरणात उड्डाणपूल आकारास आल्यानंतर या ठिकाणी पादचाऱ्यांसाठी भुयारी मार्गाची व्यवस्था केली गेली. या नियोजनामुळे द्वारका चौकाची कोंडीतून सुटका होईल, अशी अपेक्षा होती. तथापि, तसे काही घडले नाही. उलट वेगवेगळे प्रयोग करूनही दिवसागणिक चौकातील वाहतुकीची अवस्था बिकट होत आहे. काही महिन्यांपूर्वी राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणच्या तज्ज्ञांनी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी काय करता येईल, याचा अभ्यास केला होता. चौकातील भुयारी मार्गदेखील वापराविना बंद आहे. वाहतूक कोंडीमुळे हा चौक पार करणे वाहनधारकच नव्हे तर पादचाऱ्यांसमोरही आव्हान ठरते. या पाश्र्वभूमीवर, वाहतूक पोलिसांनी नव्याने नियोजन केले आहे. द्वारका चौकातील वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्यासाठी या परिसरातील सहा रस्त्यांवर वाहतुकीस प्रवेश बंद करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या व्यतिरिक्त दोन्ही सव्‍‌र्हिस रोड हे एकेरी मार्ग करण्यात येणार आहे. त्यामुळे वाहनधारकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

वाहतुकीवर आलेले र्निबध व पर्यायी व्यवस्था

*  वडाळा नाकाकडून सव्‍‌र्हिस रोडने द्वारका चौकाकडे जाणारी सर्व वाहतूक –

या मार्गावरील वाहतूक सव्‍‌र्हिस रोडने द्वारका चौकाकडे न जाता ती पुलाखालून आग्रारोडने द्वारका चौकाकडे जाईल.

*  पखाल रस्ता तसेच कऱ्हाड बंधू भेळभत्त्याकडून द्वारका चौकाकडे येणारी वाहतूक- या मार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक ही सव्‍‌र्हिस रोडने द्वारका चौकाकडे न जाता ती सव्‍‌र्हिस रोडने वडाळा नाका येथून आग्रा रोडने द्वारका बाजूकडे जाईल.

* द्वारका हॉटेलकडून सव्‍‌र्हिस रोडने टाकळी चौफुलीकडे जाणारी वाहतूक –

या मार्गावरील वाहतूक द्वारका चौकातून आग्रारोडने टाकळी चौफुली मार्ग जवळून टाकळी चौफुलीकडे जाईल.

* नानावलीकडून ट्रॅक्टर हाऊस जवळून, जाकीर हुसेन व शिवाजी चौक कथडाकडून सव्‍‌र्हिस रोडने द्वारका बाजूकडे जाणारी वाहतूक- उपरोक्त मार्गावरील वाहतूक सव्‍‌र्हिस रोडने द्वारकाकडे न जाता ट्रॅक्टर हाऊस टाकळी चौफुलीमार्गे आग्रा रोडने इतरत्र जाईल.

*  वडाळा नागा, नागसेननगर, वोक्हार्ट रुग्णालयाकडून सव्‍‌र्हिस रोडने द्वारकाकडे येणारी वाहतूक- या मार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक ही उड्डाण पुलाखालून आग्रारोडने द्वारका बाजूकडे जाईल.

* द्वारका चौकातून बागवानपुरा बाजूकडे जाणारी वाहतूक -या मार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक द्वारका चौकातून बागवानपुरा बाजूकडे न जाता ती सारडा सर्कलकडे जाऊन ‘यू टर्न’ घेऊन बागवानपुरा बाजूकडे जाईल.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Traffic problem in nashik
First published on: 25-06-2016 at 01:02 IST