पुसद शहरातील मुखरे चौकात एका युवकावर अज्ञात व्यक्तींनी गोळ्या झाडल्या. ही घटना आज मंगळवारी दुपारी घडली. विशाल घाटे (२५), रा. पुसद असे गोळीबारात जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. या घटनेने पुसद शहरात खळबळ उडाली.विशाल दुचाकीने जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी त्याच्यावर गोळीबार केला. एक गोळी थेट त्याच्या कमरेखाली पायात घुसल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. तेथून पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलवण्यात आले.

हेही वाचा >>>नाशिक: जनलक्ष्मी, समर्थ बँकेसह मविप्र सेवक सोसायटीत सत्ताधारीच विजयी

lucky number by date of birth
पैसा, पद, प्रतिष्ठा तुम्हाला कधी मिळणार? भाग्यांकावरून पाहा तुमचे लकी वर्ष
व्यक्तिवेध : मीना चंदावरकर
What was the cause of the Rwandan genocide 30 years ago
१०० दिवसांत ८ लाखांची कत्तल…३० वर्षांपूर्वीच्या रवांडा नरसंहाराचे कारण काय होते? सद्यःस्थिती काय?
This video of an elderly cobbler and two stray dogs in Mumbai
“जगातील सर्व श्रीमंतापेक्षा श्रीमंत आहे हा व्यक्ती”! भटक्या कुत्र्यांना प्रेमाने थोपटणाऱ्या काकांचा हृदयस्पर्शी Video Viral

जुन्या वैमनस्यातून ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू आहे. पुसद शहरात काही दिवसांपूर्वीसुद्धा गोळीबाराच्या घटना घडल्या आहेत. वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.