नाशिक : बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर येथे भाविकांच्या गर्दीचा फायदा घेत चोरी करणाऱ्या तीन महिलांना पोलिसांनी अटक केली. विठाबाई उपाधे (४५, रा. संगमनेर), मंगल हातागळे (२८, रा, श्रीरामपूर) आणि अलकाबाई सोनवणे (३८, रा. संगमनेर) अशी त्यांची नावे आहेत. रविवारी अक्षया शेट्टी (३३, रा. कर्नाटक) या त्र्यंबक येथे दर्शनासाठी आल्या होत्या. मंदिर परिसरातील दर्शन रांग पाहता त्यांनी देणगी दर्शनचा पर्याय स्वीकारला. तिकीट घेत असताना त्यांच्या जवळील बॅगेतून संशयिताने तीन हजार ९१० रुपये रोख रकमेसह महत्त्वपूर्ण कागदपत्रे असलेली बॅग लंपास केली. हा प्रकार लक्षात येताच अक्षया यांनी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार केल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करत सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले असता त्यांना अक्षया यांची बॅग लंपास करताना तीन महिला आढळल्या. त्र्यंबक देवस्थान परिसरातच या महिला पुन्हा एकदा चोरी करण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्यांना पकडले.
संग्रहित लेख, दिनांक 24th Jul 2019 रोजी प्रकाशित
त्र्यंबकेश्वर देवस्थानात चोरी करणाऱ्या महिलांना अटक
बक देवस्थान परिसरातच या महिला पुन्हा एकदा चोरी करण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्यांना पकडले.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 24-07-2019 at 04:25 IST
Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Women arrested for stealing devotees money at trimbakeshwar temple zws