News Flash

नवी मुंबईतील किलबिलाटात वाढ

उरण भागात या पक्ष्यांची शिकार केली जात असल्याची दखल वनविभागाने घेतली आहे.

फ्लेमिंगोंची संख्या जास्त आहे.

१६८ प्रजातींचे पक्षी 

ठाणे खाडकिनारी वाशी व ऐरोली खाडीपुलाच्या दुतर्फा तयार झालेले कांदळवन आणि पक्ष्यांना मिळणारे मुबलक खाद्य यामुळे या भागात पक्ष्यांची संख्या वाढली असल्याचे महापालिकेने तयार केलेल्या पर्यावरण अहवालात स्पष्ट झाले आहे. या सर्व पक्ष्यांची माहिती पक्षीप्रेमींना उपलब्ध व्हावी यासाठी खाडिकिनारी फलक लावण्याचे काम पालिका अधिक जोमाने करणार आहे. वनविभागाच्या वतीने ऐरोली येथे अशा प्रकारच्या जैवविविधतेची माहिती देणारे केंद्र नुकतेच सुरू करण्यात आले आहे. आता पालिका दिवा ते दिवाळ्यापर्यंत आढळणाऱ्या पक्ष्यांची माहिती जनतेला देणार आहे. उरण भागात या पक्ष्यांची शिकार केली जात असल्याची दखल वनविभागाने घेतली आहे. सर्व पक्ष्यांची परिपूर्ण माहिती देणारे फलक तयार करण्याचे काम पालिका ‘बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी’वर (बीएनएचएस) सोपविणार आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने खारफुटीचे संवर्धन करण्याची जबाबदारी स्थानिक प्राधिकरणांवर टाकली आहे. त्यामुळे खारफुटीच्या संवर्धनासाठी कोकण विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करून दर महिन्याला आढावा घेतला जात आहे. पूर्वी स्थानिक आगरी कोळी समाजाकडून सरपणासाठी खारफुटीची तोड होत होती. पालिका व वनविभागाच्या उपाययोजनांमुळे गेल्या पाच वर्षांत खाडीकिनाऱ्यावर खारफुटीचे जंगल तयार झाले आहे. मुंबई, ठाण्यापेक्षा या भागात अधिक पक्षी आहेत. फ्लेमिंगोंची संख्या जास्त आहे. नवी मुंबईच्या खाडीकिनारी आढळणाऱ्या विविध प्रकारच्या पक्ष्यांची माहिती फलक तयार करण्याचे काम पालिका बीएनएचएसवर सोपविणार असून त्या-त्या विभागात आढळणारे पक्षी त्यांची माहिती यांचे फलक लावले जाणार आहेत. ऐरोलीत नक्षत्र उद्यानातील फलकांप्रमाणेच कोपरखैरणे, वाशी, बेलापूर येथेही फलक लावण्यात येतील.

नवी मुंबईला विस्र्तीण खाडिकिनारा लाभला आहे. गेल्या काही वर्षांत या भागात खारफुटीच्या जंगलाची वाढ झाली आहे. पक्ष्यांना जिथे खाद्य व निवारा मिळतो, त्या भागाकडे ते आर्कषित होतात. त्यामुळेच नवी मुंबई पक्ष्यांना अधिक सुरक्षित वाटू लागली आहे. इथे १६८ प्रकारचे पक्षी आढळले आहेत. त्यांची माहिती जनतेला दिली जाणार आहे.

– अंकुश चव्हाण, अतिरिक्त आयुक्त, नवी मुंबई महापालिका

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 25, 2017 2:03 am

Web Title: 168 species of birds found in navi mumbai
टॅग : Flamingo
Next Stories
1 नेरुळ-उरण रेल्वे मार्गाची चाचणी यशस्वी
2 कुटुंबसंकुल : निसर्गसोबती
3 तलावांमुळे पुराचा धोका?
Just Now!
X