नवी मुंबई महापालिका क्षेत्रात करोनाबाधितांची संख्या १६ हजारांच्या पुढे गेली आहे. शहरात आज (सोमवार) ३१९ नवे करोनाबधित आढळले असून, तिघांचा मृत्यू झाला आहे. शहरात करोनाबाधितांच्या संख्येबरोबरच मृतांच्या संख्येतही दररोज वाढ होत आहे.
वाढत्या संसर्गामुळे शहरात करोनाबाधितांची एकूण संख्या १६ हजार ४२६ झाली आहे. तर, करोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ४३४ झाली आहे. शहरात आतापर्यत तब्बल ११ हजार १६१ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. तर ४ हजार ८३१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत २१ हजार ९८ प्रतिजन चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे तात्काळ करोना चाचणी अहवाल प्राप्त होत असून शहरातील करोना प्रादुर्भाव रोखण्याचे मोठे आव्हान पालिकेसमोर आहे.
शहरात करोना चाचण्यांची संख्या एका दिवसाला २ हजारपेक्षा अधिक आहे. पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी नेरुळ येथे पालिकेची स्वतंत्र करोना चाचणी प्रयोगशाळा तयार केली असून, या प्रयोगशाळेला आयसीएमआरची आज परवानगी मिळाली आहे. त्यामुळे पालिकेची स्वतंत्र करोना चाचणी प्रयोगशाळा सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 3, 2020 8:26 pm