नवी  मुंबईत  करोनाबाधितांच्या संख्येत दररोज मोठी वाढ होत असून, मृतांची संख्याही दररोज वाढत आहे. वाढत्या संसर्गामुळे शहरात आज ३२३ नवे रुग्ण वाढले असून, शहरात करोनाबाधितांची एकूण संख्या १३ हजार २३० झाली आहे.

शहरात आज ८ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला असून, करोनामुळे मृत पावलेल्यांची एकूण संख्या ३७८ झाली आहे.  शहरात आतापर्यत तब्बल ८ हजार ६२५ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. तर शहरात ४ हजार २२७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ३०४ जणांचे करोना अहवाल प्रलंबित आहेत.

शहरात विविध भागात प्रतिजन चाचण्या करण्यात येत आहेत.  शहरातील करोना प्रादुर्भाव रोखण्याचे मोठे आव्हान पालिकेसमोर असून पालिकेने मिशन ब्रेक द करोनाची मोहिम सुरू केली आहे. तर करोनावर मात करण्यासाठी प्रशासन सातत्याने प्रयत्नशील आहे.