12 August 2020

News Flash

‘जीएसटी’ बुडविणाऱ्या व्यापाऱ्यांविरोधात कारवाई

२१०० व्यापाऱ्यांकडे २०० कोटींची थकबाकी

(संग्रहित छायाचित्र)

२१०० व्यापाऱ्यांकडे २०० कोटींची थकबाकी; गुन्हा दाखल करणार

नवी मुंबई : वस्तू व सेवा कर (जीएसटी) न भरणाऱ्या व्यापाऱ्याांंचा पाठपुरवा करण्यासाठी रायगड जीएसटी विभागाने कारवाईची धडक मोहीम सुरू केली आहे. थकबाकीची मोठी रक्कम असणाऱ्या २१०० व्यापाऱ्यांकडे मिळून २०० कोटी रुपयांचा वस्तू व सेवा कर थकीत आहे.अशा व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती राज्य कर विभागाचे राज्यकर सहआयुक्त  प्रदीप कडू यांनी दिली.

याबाबत सहआयुक्तांनी कडू यांनी सांगितले की, रायगड विभागातील विवरणपत्र न भरणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यांना वेळोवेळी स्मरण पत्र पाठवून सुद्धा त्यांच्याकडून विवरणपत्र भरले जात नाहीत. अशा ४७०० व्यापाऱ्यांना नोंदणी दाखला रद्द करण्याबाबत नोटीस दिल्या आहेत, तर विवरणपत्र दाखल करणे व विवरणपत्र न भरल्यास एक तर्फी निर्णयाबाबत ५५०० व्यापाऱ्यांना नोटीस देण्यात आली आहे. १५० व्यापाऱ्यांचे बँक खाते गोठविण्यात आले आहे. ज्या व्यापाऱ्यांनी व्यापार करताना जमा केलेला कर सरकारी तिजोरीत भरला नाही, अशा कराची रक्कम ५० लाखांपेक्षा अधिक असेल व तीन महिन्यापेक्षा जास्त कालावधीसाठी विवरणपत्र भरली नसतील, अशा व्यापाऱ्यांना पोलीस कारवाईस सामोरे जावे लागणार आहे. सदर मोहीम ही पुढील एक महिना चालू राहणार आहे.  विवरणपत्र तात्काळ दाखल करून त्यानुसार येणारा कर भरून होणारी कारवाई टाळा असे आवाहन सहआयुक्तांनी केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 27, 2019 1:41 am

Web Title: action against traders for not making gst payment zws 70
Next Stories
1 जैवविविधता केंद्राची विद्यार्थ्यांना सफर
2 सिडकोच्या दहा हजार घरांसाठी आज सोडत
3 यंदा मद्यपी चालकांच्या संख्येत घट
Just Now!
X