गेल्या वर्षीच्या तुलनेत ५० ते ६० रुपयांनी भाव वधारला

पूनम सकपाळ, लोकसत्ता

fir against power company team over extortion money
मीटरमध्ये गडबडीच्या नावावर विद्युत महामंडळाचा अभियंताच मागत होता लाच….अखेर पाठलाग करून….
Two women arrested for kidnapping six-year-old boy
सहा वर्षांच्या मुलाचे अपहरण करणाऱ्या दोन महिलांना अटक; मुलाची सुटका… ‘सीसीटीव्ही’ कॅमेऱ्यांद्वारे पोलिसांनी ‘असा’ लावला छडा
HDFC Bank shares up 3 percent on rise in deposits loans
ठेवी, कर्जातील वाढीने एचडीएफसी बँक समभागाची ३ टक्क्यांनी झेप
chandigarh doctor grandfather sbi share 500 rupees in 1994 know profit
याला म्हणतात खरी गुंतवणूक! आजोबांनी ३० वर्षांपूर्वी खरेदी केलेल्या ५०० रुपयांच्या शेअरवर नातू झाला लखपती

नवी मुंबई : पावसाळ्याआधी स्वयंपाकासाठीचा गरम मसाला बनविण्यासाठी गृहिणींची लगबग सुरू होते. त्यासाठीची लाल मिरची आणि त्यातील मसाले पदार्थाच्या खरेदीसाठी बाजारात त्या धाव घेतात. यंदा वाशी बाजारात (एपीएमसी) बेडगी आणि काश्मिरी मिरची दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. परंतु मिरचीचे दर गेल्या वर्षीच्या तुलनेत चढे असल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या वर्षी डिसेंबपर्यंत झालेल्या अवकाळी पावसाचा फटका मिरची पिकालाही बसल्याने मिरचीचा भाव ५० ते ६० रुपयांनी वधारला आहे. मिरचीचा हंगाम १५ दिवस लवकर संपेल, अशी शक्यता घाऊक बाजारातील व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

गेल्या वर्षी मिरचीची आवक चांगली झाली होती. त्यामुळे गृहिणींना दिलासा मिळाला होता. यंदाचे चित्र थोडे वेगळे आहे. अवकाळी पावसामुळे लाल मिरचीचे दर वधारतील, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला. मार्च महिन्यात मसाल्याचा हंगाम सुरू होतो. बाजारात आता बेडगी आणि काश्मिरी मिरची दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे, मात्र यंदा दर वाढल्याची माहिती मसाला बाजारातील घाऊक व्यापारी कीर्ती राणा यांनी दिली.

वाशी बाजारात सध्या कर्नाटकमधील बेडगी आणि अन्य राज्यांतून काश्मिरी मिरची दाखल होत आहे. रोज चार ते पाच गाडय़ा बाजारात दाखल होत आहेत.

मसाल्यात लवंगी मिरच्यांसोबत लालसर रंग येण्यासाठी बेडगी आणि काश्मिरी मिरचीचा वापर केला जातो. फेब्रुवारीअखेरीस वा मार्चच्या पहिल्या आठवडय़ात लवंगी, पांडी, संकेश्वरी मिरच्यांची आवक होते. या मिरच्यांना गृहिणींची पसंती असते. सध्या बाजारात साठवणुकीची लवंगी मिरची उपलब्ध आहे. तरीही फेब्रुवारीअखेरीस दक्षिण भारतातून मिरची दाखल होणार आहे.

मिरचीचे घाऊक दर ( किलो)

बेडगी

२०१९ : १३० ते १६० रुपये

२०२० : १८० ते २२० रुपये

काश्मिरी

२०१९ : ३०० ते ३५० रुपये

२०२० : ४०० रुपये