पनवेल शहरातील करोना रुग्णवाढ घटली

पनवेल : करोनाच्या दुसऱ्या लाटेत पनवेल शहरात करोना रुग्णवाढ मोठय़ा प्रमाणात झाल्याने २० फेब्रुवारीपासून ५०४ इमारतींत करोना रुग्ण आढळल्याने त्या इमारती प्रतिबंधित क्षेत्रे म्हणून घोषित करण्यात आल्या होत्या. आता यापैकी सोमवापर्यंत ३८९ इमारतींमधील प्रतिबंध हटविण्यात आला आहे.

पनवेलमध्ये आता ७५ टक्के प्रतिबंधित क्षेत्रात करोना रुग्ण नसल्याचे पालिकेने जाहीर केल्याने पनवेलकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. पालिकेने केलेल्या विविध उपाययोजना आणि त्यास नागरिकांनी दिलेल्या प्रतिसादामुळे हे शक्य झाल्याचे पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी सांगितले.

आतापर्यंत पालिका क्षेत्रातील करोनाग्रस्तांची संख्या ४९,३१२ असून विविध रुग्णालय आणि घरूनच उपचार घेणाऱ्यांची संख्या ४,८६३ आहे. दुसऱ्या लाटेत पालिकेने संक्रमित रुग्णांच्या वास्तव्याची ठिकाणे करोनाबाधित क्षेत्र म्हणून घोषित केले होते. या वेळी सरसकट इमारती बंद करण्याऐवजी पालिकेने तीन वेगवेगळ्या प्रकारांमध्ये त्याची विभागणी केली होती. सध्या पालिका क्षेत्रात सूक्ष्म करोनाबाधित क्षेत्रातील इमारतींवरील प्रतिबंध मोठय़ा प्रमाणात हटविण्यात आला आहे.

नोडप्रमाणे वर्गीकरण

खारघर

पूर्वी प्रतिबंधित क्षेत्र इमारती  : १८३

प्रतिबंधमुक्त इमारती  : १५३

शिल्लक प्रतिबंधित इमारती : ३०

तळोजा

पूर्वी प्रतिबंधित क्षेत्र इमारती  : १४

प्रतिबंध मुक्त इमारती  : १०

शिल्लक प्रतिबंधित इमारती : ०४

कळंबोली

पूर्वी प्रतिबंधित क्षेत्र इमारती  : ४९

प्रतिबंध मुक्त इमारती  : ३७

शिल्लक प्रतिबंधित इमारती : १२

कामोठे

पूर्वी प्रतिबंधित क्षेत्र इमारती  : १०४

प्रतिबंध मुक्त इमारती  : ६८

शिल्लक प्रतिबंधित इमारती : ३६

नवीन पनवेल

पूर्वी प्रतिबंधित क्षेत्र इमारती  : ९०

प्रतिबंध मुक्त इमारती  :       ७६

शिल्लक प्रतिबंधित इमारती : १४

पनवेल

पूर्वी प्रतिबंधित क्षेत्र इमारती  : ६४

प्रतिबंध मुक्त इमारती  :       ४५

शिल्लक प्रतिबंधित इमारती : १९

वेळोवेळी शासनाने दिलेल्या आणि पनवेल महानगरपालिकेच्या आदेशाचे काटेकोरपणे पालन केल्यास करोनाबाधित क्षेत्र कमी होण्यास नक्कीच मदत होणार आहे. नागरिकांनी करोना प्रतिबंधक त्रिसूत्रीचे पालन करत राहणे यासाठी महत्त्वाचे आहे.

– सुधाकर देशमुख, आयुक्त, पनवेल पालिका