आमदार पुत्राने भाजप प्रवेश केल्यानंतर  माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नवी मुंबई चे सर्वेसर्वा गणेश नाईक यांच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्त अखेर ठरला असून बुधवारी ११ सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता वाशी येथील सिडको प्रदर्शन केंद्रातील सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत होणार आहे.

नाईक यांच्या बरोबर नवी मुंबई पालिकेतील ५५ नगरसेवक भाजप प्रवेश करणार आहेत यामुळे पालिकेतील सत्ता बदल स्पष्ट आहे

नवी मुंबई पालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते गणेश नाईक हे भाजप मध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा गेली पाच वष्रे सुरू आहे त्यांचे आमदार पुत्र संदीप नाईक यांनी मागील महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश करून ह्या चच्रेला अर्धविराम दिला मात्र त्यांचे वडील माजी मंत्री गणेश नाईक यांच्या भाजप प्रवेशा बाबत केवळ चर्चा सुरू होती.

नाईक यांना केंद्रीय मंत्री किंव्हा पक्षाचे नेते यांच्या उपस्थितीत करावयाचा होता पण त्यांच्या तारखा जुळून न आल्याने नाईक बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आपल्या कार्य क्षेत्रात प्रवेश करीत आहेत .

नाईक यांनी एका पालिकेच्या बदल्यात दोन मतदारसंघ मागितले असल्याचे समजते या मतदारसंघा वरून शिवसेनेत धुसफूस सुरू झाली आहे