१७ नोव्हेंबर रोजी वाशी येथे ‘लोकसत्ता अर्थभान’मधून मार्गदर्शन

एकीकडे बँकांच्या विविध मुदत ठेवींवरील व्याजदर कमी होत आहे. तर दुसरीकडे भांडवली बाजाराचे प्रमुख निर्देशांक विक्रमी टप्प्यानजीक आहेत. स्थावर मालमत्ता क्षेत्रातील आर्थिक मंदीचे वातावरण आणि मौल्यवान धातूच्या दरातील चढती हालचाल, अशी स्थितीही आहे. अशावेळी गुंतवणूकदारांचे धोरण काय असावे, याबाबतचे मार्गदर्शन नवी मुंबईकरांसाठी उपलब्ध झाले आहे.

आदित्य बिर्ला सन लाइफ म्युच्युअल फंड प्रस्तुत ‘लोकसत्ता अर्थभान’ या गुंतवणूकपूरक मार्गदर्शनाचे नवे पर्व सुरू होत असून त्यातील पहिले सत्र वाशी येथे होत आहे. रविवार, १७ नोव्हेंबर २०१९ रोजी सायंकाळी ६ वाजता मराठी साहित्य संस्कृती व कला मंडळ, साहित्य मंदिर, सेक्टर ६, वाशी, नवी मुंबई येथे हा कार्यक्रम होईल. कार्यक्रमासाठी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य असून काही जागा निमंत्रितांकरिता राखीव आहे. यानिमित्ताने उपस्थितांना गुंतवणूकविषयक शंकांचे निरसन तज्ज्ञांकडून करून घेण्याची संधी उपलब्ध आहे.

‘म्युच्युअल फंड आणि गुंतवणुकीचा मेळ’ या विषयावर आर्थिक सल्लागार तृप्ती राणे या मार्गदर्शन करतील. तर अर्थशास्त्राचे प्राध्यापक कौस्तुभ जोशी हे ‘अर्थनियोजन महत्त्वाचे’ या विषयावर मार्गदर्शन करतील. पारंपरिक गुंतवणुकीचे पर्याय ते नवागत पर्याय, त्याचे प्रकार, त्यातील परतावा आणि गुंतवणुकीतील विविध जोखीम तसेच संधी  याविषयीचे विचारमंथन यावेळी उपस्थित तज्ज्ञांकडून केले जाणार आहे.

काय लोकसत्ता अर्थभान कधी रविवार, १७ नोव्हेंबर २०१९ सायंकाळी ६ वाजता

कुठे मराठी साहित्य संस्कृती व कला मंडळ, साहित्य मंदिर, सेक्टर ६, वाशी, नवी मुंबई मार्गदर्शक व विषय तृप्ती राणे  म्युच्युअल फंड आणि गुंतवणुकीचा मेळ कौस्तुभ जोशी  अर्थनियोजन महत्त्वाचे