21 February 2019

News Flash

विमानतळाची मुख्य कामे १८ फेब्रुवारीपासून

सिडकोने विमानतळपूर्व कामे जुलै २०१७ मध्ये सुरू केली आहेत.

नवी मुंबई विमानतळ

गेली अनेक वर्षे प्रतीक्षेत असलेल्या नवी मुंबई विमानतळाच्या मुख्य कामाचा प्रारंभ १८ फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्याचे राज्य शासनाने निश्चित केले आहे. याच दिवशी ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र प्रदर्शना’चे मुंबईत उद्घाटन होणार असल्याने विमानतळाच्या कामांच्या आरंभासाठी पंतप्रधानांची वेळ घेण्यात आली आहे. सिडकोने विमानतळपूर्व कामे जुलै २०१७ मध्ये सुरू केली आहेत. १६ हजार कोटी रुपये खर्चाची निविदा ‘जीव्हीके’ आणि ‘सन होजेस’ यांच्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कंपनीला देण्यात आली आहेत.

मुंबईला पर्याय ठरू पाहणाऱ्या नवी मुंबई विमानतळाची जागा २० वर्षांपूर्वी निश्चित करण्यात आली होती, मात्र भूसंपादन, केंद्र व राज्य सरकारच्या विविध परवानग्या, खारफुटी आणि विमानतळ प्राधिकरणाच्या अटींमुळे या विमानतळाचे प्रत्यक्षात काम सुरू होण्यास विलंब लागला. नवी मुंबई नियोजित विमानतळ हे ‘ग्रीन फिल्ड’ विमानतळ असून दोन रनवे आहेत. त्यासाठी एकूण दोन हजार २६८ हेक्टर जमीन लागणार असून ६७१ हेक्टर जमीन संपादनाची प्रक्रिया अद्याप सुरू आहे. त्यासाठी १० गावांतील प्रकल्पग्रस्तांचे इतरत्र स्थलांतर केले जाणार आहे. सिडकोने काही दिवसांपूर्वीच या प्रकल्पग्रस्तांना प्रोत्साहनपर भत्ता देऊन लवकर स्थलांतर करण्यास प्रवृत्त केले आहे. गेल्या वर्षी जुलैमध्ये या प्रकल्पासाठी लागणाऱ्या दोन हजार कोटी रुपये खर्चाच्या विमानातळपूर्व कामांना सुरुवात करण्यात आली.

उलवा टेकडीची उंची कमी करण्याचे काम महत्त्वाचे आहे. ९६ मीटर उंचीची ही टेकडी टेक ऑफ आणि लॅिण्डगला अडथळा ठरणार असल्याने तिची उंची आठ मीटपर्यंत कमी केली जाणार आहे. याशिवाय उलवा नदीचा प्रवाहदेखील बदलण्यात येणार आहे. या भागातून जाणाऱ्या उच्च दाबाच्या वीज वाहिन्या भूमिगत केल्या जाणार आहेत. ही कामे सुरू झाली असून विमानतळाचे मुख्य काम सुरू करण्यात आता अडथळा राहिलेला नाही.

सिडकोच्या ताब्यात ११६० हेक्टर जमीन असल्याने हे काम सुरू करण्यात आले असून मुख्य गाभा क्षेत्राचे काम करण्यास हरकत नसल्याचे दिसते.

First Published on February 7, 2018 4:07 am

Web Title: main works of navi mumbai airport start from 18 february