नवी मुंबईत करोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असताना मृतांची संख्याही दररोज वाढत आहेत. सोमवारी ८० नवे रुग्ण वाढले असून शहरात करोनाबाधितांची संख्या २,२८४ वर पोहचली आहे. तर शहरात आज २ जणांचा करोनामुळे मृत्यू झाल्याने एकूण मृतांची संख्या ७५ झाली आहे. शहरातील २,२८४ रुग्णांपैकी तब्बल १,३९७ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

नवी मुंबईत करोनाचा कहर दिवासागणिक वाढत असून शहरातील करोनाचा धोका सातत्याने वाढतच असल्याचे चित्र आहे. दुसरीकडे शहरात आज एका दिवसात ५१ जण करोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. एकीकडे शहरात दररोज करोनाबाधितांचा आकडा वाढत असून अद्याप ७२० जणांचे करोना चाचणी अहवाल प्रलंबित आहेत.