नवी मुंबई : येत्या १ जुलैपासून नववी आणि दहावीचे वर्ग सुरू करण्याबाबत नवी मुंबई महापालिकेने पूर्वतयारी केल्याची माहिती नवी मुंबई पालिका शिक्षणाधिकाऱ्यांनी दिली.

१ जुलैपासून माध्यमिक विभागातील नववी आणि दहावीचे वर्ग सुरू करण्याचा शासनाचा विचार आहे. नवी मुंबई महापालिकेत १९ माध्यमिक शाळांमध्ये पाच हजारांहून अधिक विद्यार्थी शिकत आहेत.

१ जुलैपासून शासनाने शाळा सुरू करण्याचा निर्णय जाहीर केल्यास सुरक्षेच्या दृष्टिकोनातून शाळा र्निजतुकीकरण केले जात आहे. शाळेत येणाऱ्या प्रत्येक मुलाची तपासणी करून त्यांना मुखपट्टय़ा पुरविण्यासाठीची व्यवस्था करण्यात आली आहे. विद्यार्थी संख्येच्या तुलनेत दोन वेळांमध्ये शाळा भरवणे, याबाबत तयारी सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले शहरातील शाळांमध्ये १५ जूनपासून ऑनलाइन शिक्षण सुरू करण्यात आले आहे.

१ जुलैपासून माध्यमिक शाळांचे वर्ग सुरू करण्याबाबत हालचाली सुरू करण्यात आल्या असल्या तरीही शाळा सुरू करण्याचा अंतिम निर्णय राज्य शासनाच्या निर्देशानुसारच होणार आहे.

– नितीन काळे,उपायुक्त शिक्षण विभाग