नवी मुंबई महापालिका क्षेत्रात करोनाबाधितांची संख्या ३६ हजार पार झाली असून,आतापर्यंत शहरात  एकूण ३६ हजार २५७ करोनाबधित आढळले आहेत. आज(मंगळवार) शहरात ३२३ नवे करोनाबधित रुग्ण आढळले आहेत. तर, शहरात करोनामुक्तीचा दर ८८ टक्क्यांवर पोहचला आहे.

शहरात  करोनाबाधितांच्या संख्येत दररोज वाढ होत आहे. वाढत्या संसर्गामुळे शहरात करोनाबाधितांची  एकूण संख्या ३६  हजारांच्या पुढे गेली आहे. तर, शहरात आज सहा रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला असून करोनामुळे मृत पावलेल्यांची एकूण संख्या ७४६ वर पोहचली आहे.

शहरात  ३ हजार ४८७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत एकूण १ लाख ९३ हजार २४० जनांच्या चाचण्या  करण्यात आल्या असून करोनामुक्तीचा दर वाढला आहे. तर शहरातील मृत्युदरही कमी झाला आहे.