25 February 2021

News Flash

घणसोलीजवळ अपघातात एक ठार

ठाणे-बेलापूर मार्गावरील घणसोली नाका येथे शनिवारी मध्यरात्री झालेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले

ठाणे-बेलापूर मार्गावरील घणसोली नाका येथे शनिवारी मध्यरात्री झालेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर नवी मुंबई महानगरपालिकेच्या वाशी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आजरा वझीर करेला असे या मृत व्यक्तीचे नाव असून नजमा खांडे व नसरीन खांडे या अपघातात जखमी झाले.
फोर्ड कार आणि कंटेनरचा अपघात झाला. कंटेनर चालकाच्या चुकीमुळे हा अपघात घडल्याचे पोलिसांनी सांगितले. भरधाव वेगात असलेल्या कंटनेर चालकाने फोर्ड गाडीला जोरात धडक मारली, त्यामुळे फोर्डच्या चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि भीषण अपघात घडला. कंटेनरचालक फरार झाला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 22, 2015 7:23 am

Web Title: one dead in accident at ghansoli
Next Stories
1 विसर्जनाच्या वाहनांची आरटीओकडून तपासणी
2 ग्रामीण, झोपडपट्टी भागांत उत्सवी मंडळांकडून नियम धाब्यावर
3 गोवंश हत्या न करण्याचे मशिदींच्या विश्वस्तांचे आश्वासन
Just Now!
X