महामुंबईतील पाण्याची टंचाई लक्षात घेता राज्यातील जलसिंचनाच्या भ्रष्टाचारात अडकलेले पेण तालुक्यातील बाळगंगा धरणाचे काम नवीन निविदा काढून सुरू करण्यात यावे, असा प्रस्ताव सिडकोने राज्य सरकारला दिला आहे. सिडकोने या प्रकल्पासाठी ४६९ कोटी रुपये कोकण जलसिंचन विकास महामंडळाला दिलेले आहेत. भविष्यात नैना प्रकल्पासाठी लागणारे पाणी म्हणून सिडकोने ही आगाऊ गुंतवणूक केली आहे. बाळगंगा धरणातून सिडकोला ३५० दशलक्ष लिटर पाणी मिळणार आहे.
राज्यातील २६ हजार कोटींच्या जलसिंचन घोटाळ्यात पेण तालुक्यातील बाळंगगा धरणही लाचलुचपत विभागाच्या रडारवर आले असून सध्या त्याची चौकशी सुरू आहे. भविष्यात पनवेल, उरण, पेण, खोपोली भागातील गृहनिर्माण प्रकल्पात राहाण्यास येणाऱ्या लोकसंख्येला पिण्याचे पाणी लागणार असल्याने सिडकोने या धरण उभारणीत आर्थिक वाटा उचलला आहे. त्यासाठी भूसंपादनाचा प्रश्न सोडविण्यासाठी सिडकोने आगाऊ ४६९ कोटी रुपये दिले होते. ही रक्कम कोकण जलसिंचन विकास महामंडळाकडे वर्ग झाल्यानंतर पाच महिन्यात या धरणाची फुगविण्यात आलेली रक्कम लाचलुचपत विभागाच्या चौकशीत आली आहे. अगोदर हे धरण ४९५ कोटीमध्ये होणार होते, मात्र त्याची नंतर किंमत एक हजार २०० कोटी करण्यात आली. त्यामुळे ती चौकशीच्या फेऱ्यात अडकली असून धरणाचे काम देण्यात आलेल्या एफ. ए. कन्स्ट्रक्शन कंपनीच्या संचालकाला अटक करण्यात आले आहे. याला आता सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधी झाला असून धरणाचे काम ठप्प झाले आहे. त्यामुळे भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेता जुनी निविदा रद्द करून नवीन निविदा काढण्यात यावी, असा प्रस्ताव सिडकोने सरकारला दिला असल्याचे मुख्य अभियंता संजय चौधरी यांनी सांगितले.

पनवेल महानगरपालिकेमुळे ताण?
सिडकोच्या खारघर पनवेल, कळंबोली, द्रोणागिरी, कामोठे, उलवा या स्मार्ट सिटी भागात सध्या पिण्याच्या पाण्याची टंचाई सुरू झाली असून सिडकोची सर्व मदार हेटवणे व मोरबे धरणावर आहे. महामुंबईत भविष्यात मोठी लोकसंख्या वाढणार असून पनवेल महानगरपालिका तयार होत आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची आतापासून तयारीची आवश्यकता असून धरणातून ३५० दशलक्ष लिटर पाणी मिळेल.

nashik, 14 Malnourished Children, Found in Trimbakeshwar Taluka, Treatment Malnourished Children , malnutrition in Trimbakeshwar Taluka, malnutrition in nashik, nashik news, Trimbakeshwar news,
त्र्यंबकेश्वर तालुक्यात १४ कुपोषित बालके, ग्राम बालविकास केंद्र सुरु करण्याचे आदेश
BSNL, 4G, 5G, services, Central Government
बीएसएनएलला अजूनही ४ जी, ५ जीची प्रतीक्षा! केंद्र सरकारकडून दिरंगाई
The district administration announced the list of campaign materials along with food items in the list fixed to account for Lok Sabha election expenses pune
जिल्हाधिकाऱ्यांनी पुण्यात आणली ‘स्वस्ताई’; जाणून घ्या कशी?
sangli crime news, cloroform for md drugs marathi news
सांगली: तासगाव तालुक्यातील शेतात ११ लाखांचे द्रवरुप क्लोरोफार्म जप्त, एमडीसाठीचा कच्च्या मालाचा साठा