नवी मुंबईत गल्लोगल्ली ‘स्पा’ आणि मसाज पार्लरच्या नावाखाली चालणारा वेश्या व्यवसाय नष्ट करण्यासाठी नवी मुंबई पोलिसांनी मोहीम हाती घेतली आहे. आयुक्त हेमंत नगराळे यांनी अशा पार्लरवर कारवाईचे आदेश दिले आहेत. कळंबोली येथील सेक्टर-१७ मधील सिद्धिविनायक ट्विन्स या इमारतीत भाडोत्री गाळ्यात चालणाऱ्या ‘ऑर्गेनिक स्पा’ वर  पथकाने रविवारी दुपारी छापा टाकला. यात सहा महिन्यांपासून ‘ऑर्गेनिक स्पा’मध्ये दोन महिलांच्या वतीने शरीरविक्रय केला जात असल्याची माहिती उजेडात आली. पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटक केली आहे.

नवी मुंबई गुन्हे प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपायुक्त दिलीप सावंत यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबई अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाचे प्रमुख आनंद चव्हाण यांच्या पथकाने ही कारवाई केली. कळंबोली वसाहतीमधील सेक्टर १७ येथील सिद्धिविनायक या इमारतीमध्ये दोन हजार रुपयांत ‘बॉडी टू बॉडी’ हा सांकेतिक शब्दाचा उच्चार केल्यावर संबंधित ग्राहकांना मसाज पार्लरमध्ये महिला पुरविल्या जात होत्या. कळंबोली येथील सेक्टर १७ ते २० या परिसरात मोठय़ा प्रमाणात उच्चशिक्षित वर्ग राहतो. नवी मुंबई पोलिसांनी कळंबोली येथील ऑर्गेनिक स्पावर धाड टाकून मसाज पार्लर मालक रावेंद्रनाथ पांडे आणि व्यवस्थापक प्रमोद मुखिया यांना अटक केली. आश्रयासाठी आलेल्या दोन महिलांना पांडे आणि मुखिया यांनी येथे डांबून त्यांच्याकडून सक्तीने वैश्या व्यवसाय करवून घेतल्याचे पोलीस तपासात उघड झाले.

wildlife lovers, Tigers, forest, cages,
‘वाघ जंगलात नको, पिंजऱ्यात हवेत का?’ वन्यजीवप्रेमींचा सवाल; प्रकरण काय? जाणून घ्या…
Mumbai, expensive mobile phones
मुंबई : ऑनलाईन फसवणूक करून महागड्या मोबाईलची खरेदी
Police raid on Dancers obscene dance in bungalow at lonawala
लोणावळा: बंगल्यात सुरू होता नृत्यांगनाचा अश्लील नाच; पोलिसांनी टाकला छापा
Sales of e-vehicles pune
गडकरींनी वारंवार सांगूनही लोकांनी फिरवली पाठ! ई-वाहनांच्या विक्रीला गती मिळेना

सतर्कतेचे आवाहन

परिसरात ‘स्पा’ किंवा ‘मसाज पार्लर’च्या नावाखाली कोणतेही गैरकृत्य होत असल्याचे आढळल्यास वा बेकायदा काम होत असल्याची ठोस माहिती मिळाल्यास नागरिकांनी नवी मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेशी संपर्क साधावा, माहिती देणाऱ्या व्यक्तीचे नाव गोपनीय ठेवले जाईल, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.