25 February 2020

News Flash

लैंगिक शोषण प्रकरणी सात वर्षांचा कारावास

२०१७ मध्ये वाशी येथे किसन इंगळे या ७५ वर्षीय आरोपीने सात वर्षीय मुलाचे लैंगिक शोषण केले होते.

प्रतिनिधीक छायाचित्र

दोन वर्षांपूर्वी एका अल्पवयीन मुलाचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी ठाणे जिल्हा न्यायालयाने आरोपीस ७ वर्षांचा कारावास आणि १ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

२०१७ मध्ये वाशी येथे किसन इंगळे या ७५ वर्षीय आरोपीने सात वर्षीय मुलाचे लैंगिक शोषण केले होते. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली होती. इंगळे हा सेक्टर ९, १० या परिसरातच फिरत असताना त्याने पीडीत मुलाला आडोशाला नेत लैंगिक शोषण केले. मुलाने हा प्रकार घरी सांगितल्यानंतर पोलिसांत तक्रार देण्यात आली होती. पालिसांनी आरोपीस अटक केली होती.

हे प्रकरण पोस्को कायद्यांतर्गत कारवाई करीत जलदगती न्यायालयात होते. ठाणे जिल्हा न्यायालयाने ठोस आणि परिस्थितिजन्य पुरावे आणि वैद्यकीय अहवालाच्या आधारे आरोपीस शिक्षा सुनावली.

First Published on September 12, 2019 1:40 am

Web Title: sexual abuse seven years imprisonment akp 94
Next Stories
1 कामोठे येथे दुहेरी हत्याकांड
2 बेकायदा शस्त्र बाळगणाऱ्या दोघांना अटक
3 अनंत चतुर्दशीला शहरात जड वाहनांना बंदी
Just Now!
X