गुंतवणूकदार म्हणून पहिले पाऊल टाकताना, प्रत्येकाने काही गोष्टींची मनाशी खूणगाठ बांधून घेतली तर पुढचा प्रवास सुलभ आणि समाधानकारक होतो. या काही गोष्टींमध्ये भावनिकतेचा गुंतवणुकीला असलेला पदर सर्वप्रथम दूर केला जावा, असे तज्ज्ञ गुंतवणूक सल्लागारांनी रविवारी सायंकाळी वाशी येथे आयोजित ‘लोकसत्ता अर्थभान’ कार्यक्रमातून सुचविले.

‘लोकसत्ता’कडून गुंतवणूकदार साक्षरतेसाठी नियमितपणे आयोजित केल्या जात असलेल्या कार्यRमांच्या मालिकेतील, आदित्य बिर्ला सन लाइफ म्युच्युअल फंड प्रस्तुत ‘लोकसत्ता अर्थभान’चा हा मार्गदर्शनपर कार्यक्रम येथील सेक्टर ६ मधील साहित्य संस्कृती सभागृहात रविवारी गुंतवणुकीला उत्सुक श्रोत्यांच्या उपस्थितीत पार पडला. आदित्य बिर्ला सन लाइफ म्यमुच्युअल फंडाचे क्षेत्रीय विक्रीप्रमुख अमित मांजरेकर, गुंतवणूक सल्लागार कौस्तुभ जोशी आणि सेबी नोंदणीकृत सल्लागार तृप्ती राणे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले, तर सुनील वालावकर यांनी संवादक म्हणून भूमिका बजावत श्रोते आणि वक्त्यांच्या दरम्यान दुवा साधला. या पुढील कार्यक्रम येत्या रविवारी (२४ नोव्हेंबर) सकाळी बोरिवली येथे होत आहे.

गुंतवणूकदाराला कायम शेजाऱ्याने टाकलेल्या पैशावरचा परतावा लोभस वाटत असतो. अनेक जण मग मित्र-शेजारी यांचा गुंतवणूक मार्ग अनुसरतात आणि बऱ्याचदा फसतात. गुंतवणूक भावनिक नसावी, तर गुंतवणूक कायम भान राखूनच केलेली असावी. हे असे भान शिक्षणातून नव्हे, तर जागरूकता, अभ्यास आणि अनुभवाने कमावलेल्या जाणिवेतून येते, अशी कौस्तुभ जोशी यांनी ‘कुटुंबाच्या अर्थनियोजनाचे महत्त्व’ सांगताना मांडणी केली.

गुंतवणूक ही आपल्या आयमुष्यात पुढे जे वाढून ठेवले आहे, त्यात जो अनिश्चितता आणि जोखिमेचा घटक असतो, ती जोखीम करण्यासाठी हे सर्वप्रथम घ्या, असे तृप्ती राणे यांनी नमूद केले. ही जोखीम करण्यासाठी भविष्यासाठी पुरेशा निधीच्या तरतुदीसाठी गुंतवणूक केली जायला हवी. मात्र गुंतवणुकीतही कमी-अधिक जोखीम असतेच. फरक इतकाच की ही जोखीम नियंत्रित केली जाऊ शकते. जाणीवेने, अभ्यास व माहिती मिळवून गुंतवणूकदार स्वत:च जोखीम व्यवस्थापन करू शकतात, अथवा चांगल्या

गुंतवणूक सल्लागाराची मदत घेऊ  शकतात. गुंतवणुकीतून मनाची शांतता मिळवायची झाल्यास, जोखीम व्यवस्थापन आवश्यकच ठरते. शेवटी कमावलेल्या पैशातून आनंद मिळायला हवा, मनस्ताप नव्हे, असे सांगत त्यांनी गुंतवणुकीतील प्राधान्यक्रम स्पष्ट केले. म्युच्युअल फंड आणि समभाग गुंतवणुकीचा मेळ साधून जीवनातील आर्थिक उद्दिष्टांची पूर्तता करणे शक्य असल्याचे त्या आवर्जून म्हणाल्या.

आदित्य बिर्ला सन लाइफ म्युच्युअल फंडाचे क्षेत्रीय विक्री प्रमुख अमित मांजरेकर यांनीही आपल्या सादरीकरणात,  गुंतवणूकदारांना टाळता येणारम्य़ा चुकांची मांडणी केली. वित्तीय बाजार कळायला लागला की, बरेच काही करू पाहण्याच्या आर्थिक वर्तणुकीतून अनेकांनी नुकसान ओढवून घेतल्याची उदाहरणे असल्याचे त्यांनी सांगितले. गुंतवणूक कशासाठी, त्यातून काय साध्य करावयाचे आहे याची आर्थिक उद्दिष्टे पक्की असतील, तर गोंधळ न उडता जपून व सावध पावले आपोआप पडत जातील, असे त्यांनी विशद केले.

राज्यातील राजकीय अस्थिरता, अर्थव्यवस्थेचीही मंदीसदृश कोंडी आणि दुसरीकडे भांडवली बाजाराचे निर्देशांक विक्रमी शिखरावर अशा स्थितीत गुंतवणुकीचे होणार काय आणि पैसा गुंतवायचा तर कुठे, असे काही नेमके प्रश्न उपस्थित श्रोत्यांकडून यावेळी उपस्थित करण्यात आले. कार्यRमात वक्त्यांनी श्रोत्यांकडून पुढे आलेल्या या नेमक्या प्रश्नांचीही उत्तरेही देण्यात आली.

प्रायोजक

नाटय़वर्तुळात मानाची स्पर्धा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘लोकसत्ता’ आयोजित ‘सॉफ्टकॉर्नर’ प्रस्तुत ‘लोकसत्ता लोकांकिका’ ही राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा ‘अस्तित्व’च्या सहकार्याने पार पडते. ‘आयओसीएल’ पावर्ड बाय असलेल्या या स्पर्धेसाठी ‘मे.बी.जी. चितळे डेअरी’ हे असोसिएट पार्टनर आहेत. तर दरवर्षीप्रमाणे लोकांकिकाच्या मंचावरील गुणवान कलाकारांना चित्रपट मालिका क्षेत्रात उतरण्याची संधी देणारे ‘आयरिस प्रॉडक्शन’ हे यंदाही स्पर्धेचे टॅलेंट पार्टनर आहेत.

‘लोकसत्ता अर्थभान’चा हा मार्गदर्शनपर कार्यक्रमात आदित्य बिर्ला सन लाइफ म्युच्युअल फंडाचे क्षेत्रीय विक्रीप्रमुख अमित मांजरेकर, गुंतवणूक सल्लागार कौस्तुभ जोशी आणि सेबी नोंदणीकृत सल्लागार तृप्ती राणे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले, तर सुनील वालावकर यांनी संवादक म्हणून भूमिका बजावली.