नियमबाह्य़ गतिरोधकांमुळे अपघातांत वाढ, वाहतूक कोंडी

गतिरोधक बसवण्यासाठी असलेल्या उंचीच्या नियमांना हरताळ फासून आणि एकमेकांना खेटून बांधलेल्या गतिरोधकामुळे नवी मुंबईत वाहनचालकांना अपघाताचा सामना करावा लागत आहे, तसेच वाहतूक कोंडीही होत असल्याने शहराची गती मंदावली आहे.

नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील नागरिकांना आधीच अरुंद रस्ते, रस्त्यांची दुर्दशा, त्यावर पडलेले खड्डे, गटारे, भूमिगत वीजवाहिन्या टाकण्यासाठी खोदलेले रस्ते याचा सामना करावा लागत असताना महापालिकेने चुकीच्या पद्धतीने टाकलेल्या गतिरोधकांचाही त्रास सहन करावा लागत आहे. जास्त उंचीच्या गतिरोधकांमुळे वाहनांना धक्के बसत असल्याने वाहनचालक व प्रवाशांना मणक्यांचे त्रास उद्भवू लागले आहेत.

वाहनचालकांच्या वेगावर नियंत्रण राहावे यासाठी वाहतूक विभागाच्या परवानगीने रस्त्यावर ठरावीक अंतरावर गतिरोधक बसविले जातात, मात्र याबाबत काही नियम आखून देण्यात आले आहेत. या नियमांना डावलून शहरातील सर्व गल्लीबोळातील रस्त्यांसह ठाणे-बेलापूर मार्गावर गतिरोधक बसविले जात आहेत. या गतिरोधकांवर सुरक्षिततेचा उपाय म्हणून रिफ्लेक्टर बसविण्याची आवश्यकता असते, परंतु ते बसवले गेलेले नाहीत. यामुळे रात्रीच्या वेळी गतिरोधकांचा अंदाज न आल्याने अपघात होत आहेत. काही ठिकाणी एकमेकांना खेटून गतिरोधक बसविण्यात येत असल्याने अपघातांची संख्या वाढत आहे. ठाणे-बेलापूर मार्गावर तुभ्रे, तुभ्रे पुलाखाली, दिघा, नवी मुंबईच्या प्रवेशद्वार असणाऱ्या गणपती पाडा या ठिकाणी टाकण्यात आलेल्या गतिरोधकांमुळे अपघात होत आहेत. तुभ्रे येथे एकमेकांना खेटून बांधण्यात आलेल्या गतिरोधकांमुळे तुभ्रे स्टेशननजीक नेहमीच वाहतूक कोंडी होते. ऐरोली, दिवा, घणसोली, कोपरखरणे, वाशी, सानपाडा, नेरुळ, बेलापूरअंतर्गत असणाऱ्या रस्त्यावरील काही गतिरोधकांवर पांढऱ्या रंगाचे पट्टे मारण्यात आले नसल्याने रात्रीच्या वेळीअपघात होऊन वाहने पडण्याच्या घटना घडत आहेत. तसेच एमआयडीसीमधील दिघा ते रबाळेपर्यंत अर्धवट अवस्थेत असलेल्या कामांच्या ठिकाणी पूर्वी असणाऱ्या गतिरोधकांवरचे सफेद पट्टे फिके झाल्याने अपघात घडत आहेत. अचानक समोर येणाऱ्या गतिरोधकांमुळे वाहनचालकांचाही गोंधळ उडत आहे.

नियम डावलून उभारणी

वाहनचालकांच्या वेगावर नियंत्रण राहावे यासाठी वाहतूक विभागाच्या परवानगीने रस्त्यावर ठरावीक अंतरावर गतिरोधक बसविले जातात, मात्र याबाबत काही नियम आखून देण्यात आले आहेत. या नियमांना डावलून शहरातील सर्व गल्लीबोळातील रस्त्यांसह ठाणे-बेलापूर मार्गावर गतिरोधक बसविले जात आहेत. या गतिरोधकांवर सुरक्षिततेचा उपाय म्हणून रिफ्लेक्टर बसविण्याची आवश्यकता असते, परंतु ते बसवले गेलेले नाहीत. यामुळे रात्रीच्या वेळी गतिरोधकांचा अंदाज न आल्याने अपघात होत आहेत. काही ठिकाणी एकमेकांना खेटून गतिरोधक बसविण्यात येत असल्याने अपघातांची संख्या वाढत आहे.