20 January 2019

News Flash

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी उपाययोजना

वाशी येथील खाडीपुलाच्या दुरुस्तीमुळे उड्डाणपुलावरील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.

वाशी खाडीपूल दुरुस्तीमुळे पामबीच, ठाणे-बेलापूर मार्गावरही वाहनांची वर्दळ वाढली

वाशी येथील खाडीपुलाच्या दुरुस्तीमुळे उड्डाणपुलावरील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. शनिवारपासून मुंबईहून पनवेलकडे येणारी हलकी वाहने जुन्या खाडीपुलावरून सोडण्यात येत आहेत. ही हलकी वाहने पामबीच मार्गावरून बेलापूरला जात आहेत. तर जड वाहने ऐरोलीतील वाहने ठाणे-बेलापूर मार्गावरून पुढे पनवेला जात आहेत. दरम्यान वाहतूक व्यवस्थेत केलेल्या बदलामुळे पामबीच व ठाणे-बेलापूर मार्गावर होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेता खबरदारीचे उपाय केल्याची हमी वाहतूक पोलिसांनी दिली आहे.

शनिवारपासून सुरू असलेले खाडी पुलावरील दुरुस्तीचे काम अल्पावधीत पूर्ण करण्याच्या सूचना वाहतूक पोलिसांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिलेल्या आहेत. त्यामुळे खाडी पुलावरील दुरुस्तीचे काम वेगाने सुरू आहे. मुंबईहून येणारी जड वाहने ऐरोली खाडीपुलावरून पुढे ठाणे-बेलापूर मार्गावरून प्रवास करत आहेत. हलकी वाहने कोपरखैरणे व्हाइट हाऊन इथून पामबीच मार्गे पुढे बेलापूरकडे जात आहेत. दरम्यान या दोनही मार्गावर वाहतूक कोंडी वाढत असल्याने वाहतूक पोलिसांनी खबरदारीच्या उपायोजना केल्याची माहिती देण्यात आली आहे.

नेहमीच या वेगवान मार्गावर वाहनांची वर्दळ असते. वाशी खाडीपुलावर काम सुरू झाल्यापासून पामबीच मार्गावरही वाहनांची वर्दळ वाढली आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांची योग्य ती व्यवस्था केली आहे.

 –नंदकुमार कदम ,साहाय्यक वाहतूक निरीक्षक ,सीवूड्स  

First Published on February 8, 2018 1:28 am

Web Title: traffic problem vashi bridge work