News Flash

१८ तासांत गुन्ह्य़ाचा तपास

समाजमाध्यमामुळे मृत महिलेची ओळख; तीन आरोपींना अटक

प्रतिनिधिक छायाचित्र

समाजमाध्यमामुळे मृत महिलेची ओळख; तीन आरोपींना अटक

अज्ञात महिलेच्या मृतदेहाची ओळख समाजमाध्यमाचा खुबीने वापर केल्याने सदर महिलेच्या हत्येची उकल अवघ्या १८ तासांत झाली. याप्रकरणी अगोदरच दोन महिला आरोपींना उरण पोलिसांनी अटक केली असून गुरुवारी तिसऱ्या आरोपीस जेरबंद करण्यात आले.

मृत महिला आणि तिचा पती विभक्त झालेले होते. या महिलेने अन्य धर्मीयाच्या एका व्यक्तीसमवेत विवाह केला होता. मात्र त्याच्या पहिल्या पत्नी आणि मुलीस हा विवाह मान्य नव्हता. त्यामुळे कुरबुरी वाढल्या होत्या त्यातच या महिलेस अन्य घर घेऊन दिल्याने पहिल्या पत्नीचा अधिकच पारा चढला. त्यातूनच पहिली पत्नी मुलगी आणि मुलीच्या मित्रांनी कट रचून या महिलेस चिरनेर परिसरात आणून तिची हत्या केली. उरणनजीक चिरनेर परिसरात एका महिलेचा मृतदेह आढळून आला होता.

तपासात महिलेची ओळख पटेल असे काहीही मृतदेहाजवळ आढळून आले नव्हते. हत्येची उकल करण्यासाठी अगोदर महिलेची ओळख पटणे गरजेचे असते मात्र या प्रकरणात ओळख पटेल असे धागेदोरे हाती न लागल्याने तपास खुंटला होता. मात्र वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश कुलकर्णी यांनी मृतदेहाचे छायाचित्र समाजमाध्यमाच्या पोलीस आणि स्थानिकांच्या समूहात व्हायरल केले. सुदैवाने या महिलेचा चुलत भाऊ  उरण येथे राहात होता. हे छायाचित्र त्याने पाहताच ही आपलीच चुलत बहीण आहे हे ओळखले. मात्र चेहरा सुजलेल्या अवस्थेत असल्याने खात्री करण्यासाठी महिलेच्या सख्या भावास फोटो पाठवून शंका विचारली असता त्याने आपली बहीणच असल्याचे सांगितले. महिलेची ओळख पटल्यावर पोलिसांनी तपास करत बुधवारी याप्रकरणी तबस्सुम मुक्तार संग्राम तिची मुलगी रुसार संग्राम यांना तर हुसेन अली या तिसऱ्या आरोपीस गुरुवारी अटक केली, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश कुलकर्णी यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 28, 2020 2:12 am

Web Title: uran police crack woman murder case in just 18 hours zws 70
Next Stories
1 खारघर, तळोजात प्रदूषणावरून संभ्रम
2 सिडकोकडून आणखी एक लाख घरे
3 महिलेवर सामूहिक बलात्कार करणारे तिघे अटकेत
Just Now!
X