06 March 2021

News Flash

नवी मुंबईत माथाडी युनियनच्या वादातून कामगाराची हत्या ?

मारेकऱ्यांनी मन्सूरला काठी, लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. मन्सूरला अमानूष मारहाण करण्यात आल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

प्रतिकात्मक छायाचित्र

नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कामगाराची हत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. सय्यद मन्सूर असे या कामगाराचे नाव असून माथाडी युनियनच्या वादातून ही हत्या झाल्याचा संशय आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

एपीएमसीतील कांदा बटाटा मार्केटमधील कामगार सय्यद मन्सूर (वय ३२) याची मंगळवारी हत्या करण्यात आली. मारेकऱ्यांनी मन्सूरला काठी, लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. मन्सूरला अमानूष मारहाण करण्यात आल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या प्रकरणी अधिक तपास सुरु असून अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नाही.

एपीएमसी मार्केटमध्ये अनेक कामगार युनियन असून त्यांच्यात अनेकदा हाणामारी आणि वाद होत आसतात. या वादातूनच त्याची हत्या करण्यात आली की वैयक्तिक वादातून ही हत्या झाली, याचा तपास सुरू असल्याचे तपास अधिकारी मधुकर केकाण यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 30, 2018 4:27 pm

Web Title: vashi apmc market labourer murdered over dispute
Next Stories
1 सुरक्षा चाचणीवर मदार
2 बीट चौकी उघडली, पण उद्घाटनापुरतीच
3 कोकण भवन परिसरातील वाहनतळाचा प्रश्न ऐरणीवर
Just Now!
X