News Flash

बलात्कार करुन फोडलं डोकं, चालत्या ट्रेनमधून रेल्वे रुळावर फेकलं; नवी मुंबईतील संतापजनक घटना

पोलिसांकडून तपास सुरु

नव्या वर्षात मुंबई पुन्हा एकदा पूर्वीसारखी सुसाट धावेल, या आशेत मुंबईकरही नव्या वर्षाच्या स्वागतासाठी आतूर झाले आहेत. मात्र, करोनाचं संकट अजूनही पूर्णपणे टळलेलं नाही, याची जाणीव करून देत मुंबई पोलिसांनी नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन केलं आहे.

नवी मुंबईत गंभीर जखमी अवस्थेत तरुणी सापडल्याने खळबळ उडाली आहे. वाशी पुलावर तरुणी जखमी अवस्थेत आढळली असून तिच्या डोक्याला गंभीर जखमा आहेत. या २५ वर्षीय तरुणीवर बलात्कार करुन चालत्या ट्रेनमधून फेकण्यात आल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. घटनास्थळी कोणतंही सीसीटीव्ही नसल्याने पोलीस सध्या पीडित तरुणी शुद्धीवर येण्याची वाट पाहत आहेत. तरुणी शुद्धीत आल्यानंतर तिचा जबाब नोंदवला जाईल.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “आम्ही पनवेल, ठाणे आणि वाशीपर्यंत हार्बर आणि ट्रान्स हार्बर लाईनवरील सर्व सीसीटीव्ही तपासले. पण तरुणी ट्रेनमध्ये चढताना कोणत्याही सीसीटीव्हीत दिसलेलं नाही. डोक्यावरील जखमा पाहता तरुणीवर जड वस्तूने हल्ला झाल्याचं आणि शरिरावरील जखमांवरुन चालत्या ट्रेनमधून फेकल्याचं दिसत आहे”.

पोलिसांनी याप्रकरणी हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. जेजे रुग्णालयाने आपल्या रिपोर्टमध्ये तरुणीवर लैंगिक अत्याचाराची शक्यता वर्तवली आहे. यामुळे पोलिसांनी बलात्काराचा गुन्हाही दाखल केला आहे. पोलीस सध्या फॉरेन्सिक रिपोर्टची वाट पाहत आहेत.

मंगळवारी सकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास वाशी रेल्वे स्टेशन मॅनेजरने जीआरपी कॉन्स्टेबल भाऊसाहेब शिंदे यांना एक तरुणी वाशी पुलावर जखमी अवस्थेत पडली असल्याची माहिती दिली आहे. वाशी स्थानकापासून अडीच किमी अंतरावर तरुणी आढळली.

यानंतर शिंदे जखमी तरुणीला जीआरपी स्टेशनमध्ये घेऊन आले. जखमी अवस्थेत असल्याने तसंच डोक्यातून रक्तस्त्राव होत असल्याने तरुणीला वाशीमधील एनएमएमसी रुग्णालयात प्राथमिक उपचार देण्यात आले. तपासणी केल्यानंतर तरुणीला जेजे रुग्णालयात हलवण्यात आलं. तरुणी इतक्या गंभीर अवस्थेत होती की आपलं नावही सांगू शकत नव्हती.

तरुणीला ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आल्याने जेजे रुग्णालयातील डॉक्टरांनी पोलिसांना जबाब नोंदवू दिला नाही. पीडित तरुणी टिटवाळ्याची असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. पवईत तरुणी मोलकरीण म्हणून काम करत असल्याची माहिती कुटुंबाने दिली आहे. विकेण्डला ती नेहमी घऱी येत असेल.रविवारी पवईतून निघाली तेव्हा कुटुंबाचं तिच्याशी बोलणं झालं होतं. पोलीस सध्या तपास करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 25, 2020 11:03 am

Web Title: woman raped and thrown on vashi railway bridge in navi mumbai sgy 87
Next Stories
1 ऐरोली ते उरण सागरी मार्ग
2 खाडीपुलावर सापडलेल्या युवतीवर लैंगिक अत्याचार?
3 जेएनपीटी कंटेनर टर्मिनलचे खासगीकरण
Just Now!
X