scorecardresearch

नवी मुंबई : बाल लैंगिक अत्याचार (पोस्को) प्रकरणात पीडितेची ओळख देणे पडले महागात ; एका वकीलासह एकूण चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल

बाल लैंगिक अत्याचार अत्याचारात पिडीतेची ओळख सांगणे महागात पडले असून या प्रकरणी चार जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

नवी मुंबई : बाल लैंगिक अत्याचार (पोस्को) प्रकरणात पीडितेची ओळख देणे पडले महागात ; एका वकीलासह एकूण चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल
( संग्रहित छायचित्र )

बाल लैंगिक अत्याचार अत्याचारात पिडीतेची ओळख सांगणे महागात पडले असून या प्रकरणी चार जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या चौघांनी पत्रकार परिषद घेत पोलिसांनी चुकीचा गुन्हा दाखल केला गेला असा दावा केला होता.  धक्कादायक बाब म्हणजे या चार आरोपित एक वकील असून पत्रकार परिषदेत पिडीत युवतीला सुद्धा आणण्यात आले होते.

हेही वाचा >>> नवी मुंबई : वेदांत फॉक्सकॉन कंपनी गुजरातला राज्य सरकारच्या विरोधात राष्ट्रवादीची निदर्शने

महेंद्र आनंदा कांबळे, अँडव्होकेट अनिल बुगडे, शांती गुप्ता, जिना येसुदासान असे यातील आरोपींची नावे आहेत. सी उड येथे बेथेल गाँस्पेल चँरीटेबल ट्रस्ट असून या ठिकाणी बेकायदेशीर आश्रम शाळा चालविण्यात येते होती.  या  माहितीच्या आधारावर जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी ठाणे कार्यालयाने सदर ठिकाणी धाड टाकून कारवाई केली. या प्रकरणी एनआरआय पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला व अनेक मुलींची सुटका केली. यावेळी सुटका केलेल्या मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचे तपासणीत समोर आल्याने राजकुमार येसुदासन याला अटक करण्यात आली आहे. मात्र हा सर्व प्रकार बनाव असल्याचा दावा करीत आर्क फौंडेशनच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेत जे प्रसिद्धी पत्रक देण्यात आले त्यात पिडीत युवतीचे नाव देण्यात आले होते तसेच त्या पिडीतेला प्रसिद्धी माध्यमांच्या समोर (पत्रकार परिषदेत)  आणण्यात आले होते. धक्कादायक बाब म्हणजे यात कायद्याचे तज्ञ असणारे अँडव्होकेट अनिल बुगडे हे सुद्धा उपस्थित होते. या सर्वांच्या विरोधात पिडीतची ओळख सांगणे, गुन्ह्याविषयी अधिकृत माहिती नसताना खोटा गुन्हा दाखल केल्याचा दावा केल्याचे सांगणे, पीडीतेला प्रसार माध्यमांच्या समोर आणणे, तिचा उल्लेख करणे ज्यामुळे तिची प्रतिष्टा खालावली, पिडीतेचे खाजगीपणाचे उलंघन करणे आदी कलमान्वये नेरूळ पोलीस ठाण्यात  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या