वेदांत फॉक्सकॉन गुजरातला गेल्याने राज्य शासनाच्या विरोधात नवी मुंबईतील वाशी येथे राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी सेलने निदर्शने करण्यात केली. राजकीय आकसापोटी रोजगाराच्या संधी गमावणे युवकांना पर्यायाने राज्याला परवडणारे नाही असा आरोपही करण्यात आला.महाराष्ट्रात होत असलेल्या वेदांत फॉक्सकॉन कंपनीचा तब्बल दोन लाख कोटी गुंतवणुकीचा आणि दीड लाख नोकऱ्या निर्माण करणारा प्रकल्प केंद्र व राज्य शासनाने दुर्लक्षित केला आणि तो गुजरातच्या दावणीला नेऊन बांधला. आपल्या राज्यातील तब्बल दीड लाख रोजगार उपलब्ध झाला असता.

हेही वाचा >>> उरण : ‘ती’ बोट संशयित नसल्याचा पोलिसांचा दावा ; बोटीतील अतिरिक्त ३५० लिटर डिझेल प्रकरणी एक आरोपी अटकेत

आरोप नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नवी मुंबई अध्यक्ष नामदेव भगत यांनी केला. राज्य शासनचा ढिसाळपणा याला कारण असल्याचाही त्यांनी आरोप केला . याचा निषेध म्हणून वाशीतील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय प्रवेशद्वारावर राष्ट्रवादी काँग्रेस युवक आघाडीने निदर्शने केली.अशी माहिती विद्यार्थी सेलचे नवी मुंबई अध्यक्ष अक्षय बोराडे यांनी दिली. यावेळी नवी मुंबई राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस जिल्हा सचिव ओंकार कदम,जिल्हा सरचिटणीस वैभव जाधव, आदी विद्यार्थी सेलचे कार्यकर्ते उपस्थित होते.