कळंबोली वसाहतीमध्ये राहणा-या महाविद्यालयीन विद्यार्थीनीवर तीच्याच वर्गातील शिकणा-या अल्पवयीन विद्यार्थ्याने बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. संबंधित पीडित बालिका ही पाच आठवड्यांची गरोदर आहे. या धक्कादायक प्रकरणानंतर संशयीत बालकाविरोधात पोलीसांनी गुन्हा नोंदविला असून पोलीस या घटनेचा तपास गांर्भियाने करत आहेत.

हेही वाचा- स्वच्छता कामगारांचा झाडू स्वयंस्फुर्तीने नवी मुंबईकरांच्या हाती..

Neha Hiremath Murder Fayaz Karnataka
“त्याला अशी शिक्षा…”, नेहाचा खून करणाऱ्या फयाजच्या वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
ragging case in Pune, pune,
पुण्यातील रॅगिंग प्रकरणाला धक्कादायक वळण! अधिष्ठाताच संशयाच्या भोवऱ्यात
Nursing Student s Suicide Prompts Summer Vacation
नागपुरात विद्यार्थिनीच्या आत्महत्येनंतर वसतिगृह रिकामे, महाविद्यालय प्रशासनाने मग…
clemen lobo arrested after 36 years in salim cassetwala murder case
वसईतील प्रसिध्द सलीम कॅसेटवाला हत्या प्रकरण; फरार आरोपी क्लेमेन लोबोला ३६ वर्षांनी अटक

खारघर येथील एका शाळेत हे दोनही बालक शिकत होते. संशयीत बालक हा रोडपाली येथील सेक्टर २० मध्ये राहत होता. तर पीडीता ही तीच्या पालकांसोबत सेक्टर पाच येथे राहते. पीडितेचे वय १७ वर्षे पाच महिने आहे. तर संशयीत आरोपी बालक हा १७ वर्षांचा आहे. डिसेंबर महिन्यात पीडिता मित्राच्या घरी गेल्यावर त्याने अत्याचार केल्याचे उघडकीस आले. सध्या पाच आठवड्यांची गरोदर असल्याचे पालकांच्या ध्यानात आल्यावर हे प्रकरण शाळेत आणि पोलीस ठाण्यात पोहचले.