scorecardresearch

नवी मुंबईतील रिओ व रिया अडकले लग्न बंधनात; दोन श्वानांचा अनोखा विवाह

लग्न समारंभानंतर दोन्ही श्वानांची वरातही कढण्यात आली होती. हा विवाह सोहळा पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

नवी मुंबईतील रिओ व रिया अडकले लग्न बंधनात; दोन श्वानांचा अनोखा विवाह
नवी मुंबईत दोन श्वानांचा अनोखा विवाह सोहळा

आजवर आपण श्वानांच्या बाबतीत विविध प्रकारे स्पर्धा होतात, मनोरंजन होते हे पाहत आलो आहोत. धावण्याच्या स्पर्धा, वाढदिवस , फॅशन इत्यादी मनोरंजनात्मक कार्यक्रम झाले आहेत. मात्र नवी मुंबईतील सानपाड्यात माणसाप्रमाणे चक्क दोन श्वानांचा लग्न समारंभ अगदी धुमधडाक्यात पारंपरिक पध्दतीने पार पडला आहे.

हेही वाचा- नवी मुंबई शहराचे आकर्षण असलेले वंडर्स पार्क फेब्रुवारी अखेरपर्यंत सुरु होणार?

नवी मुंबईतील सानपाडा दोन श्वानांचा अनोखा लग्न समारंभ पार पडला. यामध्ये रिया वधु श्वान तर रिओ वर असं श्वानांच नाव आहे. अगदी माणसांचे ज्याप्रमाणे पारंपरिक पद्धतीने लग्न सोहळा होतो, त्याच पद्धतीने या दोघांचा देखील लग्न सोहळा पार पडला. दोन्ही कडच्या वऱ्हाडींनी मंगलाष्टकं म्हणत वाजत गाजत हा लग्न सोहळा साजरा केला. लग्न समारंभानंतर यावेळी दोन्ही परिवाराकडून वाजत-गाजत मोठ्या उत्साहात आणि धुमधडाक्यात यांची वरातदेखील काढण्यात आली. त्यामुळे श्वानांचे समारंभ पाहण्यासाठी नवी मुंबईकरांनी एकच गर्दी केली होती.

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-01-2023 at 12:02 IST

संबंधित बातम्या