सिडकोने विकसित केलेल्या उरण चारफाट्यावरील हायमास्ट बंद असल्याने या रस्त्यावरील अंधाराचा अंदाज न आल्याने रविवारी रात्री उशिरा दुचाकीस्वाराच्या धडकेत एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. कुणाल पाटील असे मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. चारफाट्यावरील अंधाराने तरुणाचा बळी घेतल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. त्याचप्रमाणे चौकात लवकरात लवकर विजेची व्यवस्था करण्याची मागणी केली जात आहे.

हेही वाचा- नवी मुंबई : रस्ते अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांकरीता स्मरणार्थ दिवस

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रविवारी रात्री दोन मित्र उरण चारफाट्यावरून मोटारसायकल वरून जात असतांना दुचाकीस्वाराला रात्रीच्या काळोखात अंदाज न आल्याने चौकातील दुभाजकाला धडक दिल्याने दुचाकीवर मागे बसलेल्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. तर चालकाला गँभिर दुखापत झाली आहे. सिडकोच्या माध्यमातून उरणच्या चारफाट्याचे रुंदीकरण करण्यात आले आहे. या चौकात हायमास्ट बसविण्यात आला असून त्याला वीज जोडणी देण्याची प्रक्रिया महावितरण कार्यालया कडून सुरू आहे. येत्या तीन चार दिवसात हे काम पूर्ण होऊन वीज सुरू होईल अशी माहिती सिडकोच्या द्रोणागिरी नोडचे कार्यकारी अभियंता एम.एम.मुंढे यांनी दिली आहे.