उरण येथील महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीच्या वायू विद्युत केंद्रात रविवारी झालेल्या दुर्घटनेत एका अभियंत्याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर सोमवारी बोकडविरा गावातील विष्णू पाटील (४०) या कंत्राटी कर्मचाऱ्याचाही मृत्यू झाला आहे. त्यामुळे प्रकल्पा शेजारील गावातील ग्रामस्थ संतप्त झाले असून ग्रामस्थांनी वायू विद्युत केंद्राच्या प्रवेशद्वार समोर सकाळपासून आंदोलन सुरू केले आहे.

हेही वाचा- उरणच्या वायू विद्युत केंद्रात स्फोट; अभियंताचा मृत्यू, दोन कर्मचारी गंभीर

यावेळी केंद्राच्या अधिकाऱ्यांशी ग्रामस्थांच्या झालेल्या चर्चेत मृत कामगारांच्या वारसांना वायू विद्युत केंद्रात कायमस्वरूपी नोकरी व प्रत्येकी ५० लाख रुपयांच्या नुकसानभरपाई ची मागणी केली आहे. ही मागणी मान्य न झाल्यास अंतविधि न करता कामगाराचा मृतदेह केंद्राच्या प्रवेशद्वारा जवळ आणण्यात येईल असा इशारा बोकडविरा,भेंडखळ, फुंडे व डोंगरी ग्रामपंचायतीनी दिलेल्या निवेदनात दिला आहे. ग्रामस्थांच्या मागणी संदर्भात वरिष्ठांशी चर्चा सुरू असल्याची माहिती उरणच्या वायू विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता सुनील इंगळे यांनी दिली आहे.

हेही वाचा- शुल्लक कारणावरुन दोन कुटुंबात हाणामारी; पोलिसात गुन्हे दाखल

प्रकल्पात सुरक्षा अधिकारी नसने कामगार कर्मचाऱ्यांना आवश्यक असलेल्या सुरक्षा उपकरणाची कमतरता व प्रकल्पातील ४० वर्षांपासून ची नादुरुस्त उपकरणे आदी महत्वाची कारण ही ग्रामस्थांच्या आणि वायू विद्युत केंद्राच्या अधिकाऱ्यांसह झालेल्या बैठकीतून पुढे आली आहेत. त्यामुळे प्रकल्पा शेजारील गावातील नागरिकांच्याही सुरक्षेचा ही प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. त्यामुळे प्रकल्पाच्या सुरक्षेसाठी ही केंद्राने प्राधान्य देण्याची मागणी केली आहे. या आंदोलनाचे नेतृत्व जेएनपीएचे कामगार नेते भूषण पाटील,कामगार नेते महादेव घरत,बोकडविरा ग्रामपंचायत सरपंच मानसी पाटील,भेंडखळ ग्रामपंचायत सदस्य संध्या ठाकूर,लक्ष्मण ठाकूर,फुंडे ग्रामपंचायत सरपंच सागर घरत,डोंगरी मधील किरण घरत,दर्शन घरत आदीजण उपस्थित होते.