scorecardresearch

Premium

पनवेल : सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा मिळण्यासाठी आशा वर्करची निदर्शने

मानधनाऐवजी पगार आणि सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा मिळावा या मुख्य मागणीसाठी पनवेल महापालिका मुख्यालयाच्या इमारतीसमोरील महात्मा गांधी उद्यानात मंगळवारी सकाळी आशा वर्कर महिलांनी निदर्शने केली.

Asha workers protest in Panvel
पनवेल : सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा मिळण्यासाठी आशा वर्करची निदर्शने (छायाचित्र – लोकसत्ता टीम)

पनवेल : मानधनाऐवजी पगार आणि सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा मिळावा या मुख्य मागणीसाठी पनवेल महापालिका मुख्यालयाच्या इमारतीसमोरील महात्मा गांधी उद्यानात मंगळवारी सकाळी आशा वर्कर महिलांनी निदर्शने केली. एक दिवसीय धरणे आंदोलनात मोठ्या संख्येने महिलावर्ग सहभागी झाला होता. राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाने या महिलांचे नेतृत्व केले.

हेही वाचा – चंद्रपूर : सोयाबीनवर पिवळा मोझॅक, उंट अळीचे आक्रमण; पिकांची अवस्था…

AJIT PAWAR AND BUDGET
सौर कृषीपंप ते कृषी महाविद्यालयास मान्यता, अंतरिम अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी नेमकं काय? वाचा…
Sheena Bora murder case CBI applies to special court to stay documentary on Indrani Mukherjee
शीना बोरा हत्याकांड : इंद्राणी मुखर्जीवरील माहितीपटाला स्थगिती द्या, सीबीआयचा विशेष न्यायालयात अर्ज
thane heavy traffic jam asha volunteers demands eknath shinde protest morcha
ठाण्यात आशा स्वयंसेविकांच्या मोर्चामुळे वाहतूक कोंडी
job opportunities
केंद्र सरकारमध्ये नोकरी मिळविण्याचा राजमार्ग

हेही वाचा – मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीसाठीचा अर्ज आता एका क्लिकवर.. ही आहे प्रक्रिया..

पनवेल पालिकेतील आरोग्य विभागात १८३ आशा वर्कर काम करतात. मंगळवारी पालिकेविरोधात विविध घोषणा देऊन आशा वर्कर महिलांनी परिसर दणाणून सोडला. कामाचे तास निश्चित केले जावेत, सुट्टी व रजा नियमानुसार मिळावी, ऑनलाईन कामे लादू नयेत, एएनएम आणि इतर कर्मचाऱ्यांची कामे लादू नयेत, पालिकेचे ओळखपत्र मिळावे, माता मृत्यू व बालमृत्यू यांसाठी आशा वर्करांना जबाबदार ठरवले जाऊ नये, आशा वर्करचा विमा पालिकेने काढावा, अशा विविध मागण्यांसाठी मंगळवारी धरणे आंदोलन केले होते.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Asha workers protest in panvel to get government employee status ssb

First published on: 12-09-2023 at 15:38 IST

आजचा ई-पेपर : नवी मुंबई

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×