दिवाळीत फटाक्यांमुळे होणारे प्रदूषण टाळण्यासाठी फटाके न फोडण्याचा संकल्प पनवेलकरांनी केला आणि तो काही प्रमाणात यशस्वीही केला. तरीही वायुप्रदूषणामुळे त्रासलेल्या या तालुक्यातील तळोजा, कळंबोली व खारघरमधील रहिवाशांनी प्रदूषण मोजमाप यंत्राची मागणी लावून धरली आहे. तळोजातील एका लोकप्रतिनिधीने येथील प्रदूषणाची तक्रार राष्ट्रीय हरित लवादाकडे केल्यामुळे येथील प्रदूषणाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. रविवारी रात्री येथील लोकप्रतिनिधींनी घातक रसायने गटारात सोडताना एक टँकर रंगेहाथ पकडला. त्यामुळे तळोजातील कारखाने प्रदूषणाला कारणीभूत ठरत आहेत, की इतर ठिकाणचे कारखानदार घातक रसायने टाकण्यासाठी तळोजात येत आहेत, हा नवा प्रश्न उपस्थित झाला आहे.

पर्यावरण राज्यमंत्र्यांची बोलाची कढी..

विशेष म्हणजे याच तळोजा औद्योगिक क्षेत्रात तीन वर्षांपूर्वी पर्यावरण विभागाचे राज्यमंत्री प्रवीण पोटे यांनी स्थानिक प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना अंधारात ठेवून तळोजा औद्योगिक वसाहतीला भेट दिली. तळोजा सीईटीपी केंद्रामध्ये नावडेनोडच्या रहिवाशांना येत्या वर्षभरात हा परिसर प्रदूषणमुक्त करू, असे आश्वासन पोटे यांनी दिले होते. याच मंत्रिमहोदयांनी त्याच दिवशी अधिकाऱ्यांच्या फौजफाटय़ासोबत विविध कारखान्यांना भेट देऊन त्यांच्यावर आणि कारखान्यांच्या सामायिक प्रक्रिया केंद्रातील कारभारावर शेरेबाजी केली होती. त्यानंतर सचिवालयात तळोजातील प्रदूषण या विषयावर बैठका घेतल्या आणि काही अधिकारी व कारखानदारांना धारेवरही धरले. मात्र तीन वर्षे उलटल्यानंतरही तळोजातील प्रदूषणाचा प्रश्न अनुत्तरित आहे.