नवी मुंबई : सिडको महामंडळाने नवी मुंबई मेट्रोतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी क्यूआर कोडमध्ये तिकीट प्रणाली सेवा मंगळवारपासून सुरू केली आहे. कॉमन मोबिलिटी सोल्युशनच्या दिशेने सिडकोने उचलले हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. यामुळे प्रवाशांना स्वयंचलित पद्धतीने तिकीट खरेदी करता येणार आहे.

आतापर्यंत ८३ लाख प्रवाशांनी नवी मुंबई मेट्रोतून प्रवास केला असून २० कोटी रुपयांची तिकीट खरेदी केली आहे. त्यामधील ८८ लाख रुपयांपेक्षा अधिक रकमेची तिकीट खरेदी प्रवाशांनी ऑनलाइन पद्धतीने केली आहे. मंगळवारी क्यूआर तिकीट प्रणालीचे उद्घाटन सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक शान्तनु गोयल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सिडकोचे मेट्रो विभागाचे अधिक्षक अभियंता संतोष ओंभासे, महाव्यवस्थापक (ऑपरेशन व मेंटेनेन्स) मिलिंद रावराणे, कार्यकारी संचालक हरिश गुप्ता व अन्य अधिकारी उपस्थित होते. क्यूआर आधारित तिकीट प्रणालीची मंगळवारी बेलापूर मेट्रो स्थानकावर अधिकृतपणे सुरुवात करण्यात आली. या उपक्रमाचा उद्देश प्रवाशांना जलद, सुलभ व सुरळीत प्रवास अनुभव देणे हा आहे.

प्रवाशांसाठी सिडकोतर्फे भविष्यात लवकरच आणखी काही नवीन सुविधा देखील समाविष्ट केल्या जाणार आहेत. यामध्ये मोबाइल तिकीटिंग अॅपचा समावेश आहे. या अॅपच्या माध्यमातून भविष्यात प्रवाशांना मेट्रोची तिकीटे खरेदी करता येतील. आगामी व्हॉट्सॲप आधारित तिकीट सेवेच्या माध्यमातून प्रवाशांना थेट व्हॉट्सॲपद्वारे तिकीटे खरेदी करता येतील. तर नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (NCMC) च्या माध्यमातून भविष्यात एकसंध पेमेंट सोल्युशन अंतर्गत विविध वाहतूक सेवा एकत्रितपणे वापरता येऊ शकतील. या सर्व सुविधा लवकरच नागरिकांच्या सेवेसाठी उपलब्ध होणार असल्याची घोषणा सिडकोने केली आहे.

ही क्यू आर आधारित तिकीट प्रणाली मेसर्स औरियनप्रो सोल्युशन्स प्रा. लि. यांनी तयार केली असून, सिडको आणि महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि. यांच्या देखरेखीखाली कार्यान्वित करण्यात आली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लवकरच आणखी नवीन सुविधा

मोबाइल तिकीटिंग अॅपच्या माध्यमातून लवकरच प्रवाशांना मेट्रोची तिकीटे खरेदी करता येतील. आगामी व्हॉट्सॲप आधारित तिकीट सेवेच्या माध्यमातून प्रवाशांना थेट व्हॉट्सॲपद्वारे देखील तिकीटे खरेदी करता येतील. तर नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड च्या माध्यमातून भविष्यात एकसंध पेमेंट सोल्युशन अंतर्गत विविध वाहतूक सेवा एकत्रितपणे वापरता येऊ शकतील.