scorecardresearch

नवी मुंबई : नवरात्र जोरात झाली दिवाळीही उत्साहात होणार – एकनाथ शिंदे

ऐरोली येथे सुनील चौगुले स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने युरो स्कुल च्या मैदानात आयोजित गरबा उत्साहात केले.

नवी मुंबई : नवरात्र जोरात झाली दिवाळीही उत्साहात होणार – एकनाथ शिंदे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

तीन महिन्यांपूर्वी आम्ही मोठा कार्यक्रम केला आहे. त्यामुळे नवरात्री मोठ्या उत्सहात साजरा करण्यात आला आहे. तर दिवाळी देखील मोठया उत्साहात साजरी करण्यात येईल असे वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऐरोली येथे केले. ऐरोली येथे सुनील चौगुले स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने युरो स्कुल च्या मैदानात आयोजित गरबा उत्साहात केले. या सरकार मध्ये जे काम होईल ते सर्वसामान्यच्या साठी आहेत. असा विश्वास शिंदे  यांनी व्यक्त केला. हे सरकार बाळासाहेबाच्या विचारांचे सरकार आहे. तर आपली संस्कृती पुढे नेण्याचे काम येथे असणारी गरबा प्रेमी करत असल्यामुळे त्यांचे कौतुक केले. यावेळी नवी मुंबई महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते विजय चौगुले, माजी नगरसेवक ममीत चौगुले, ऍड रेंवेन्द्र पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या