भारतीय संविधानाच्या वर्धापन दिनानिमित्त उरणमध्ये गुरुवारी संविधान गौरव दिन साजरा केला जाणार आहे. या वेळी शेतकरी कामगार पक्षातर्फे जाहीर सभाही घेण्यात येणार आहे. सकाळी साडेनऊ वाजता आंबेडकर उद्यानातील पुतळ्याला अभिवादन करून नंतर अभिवादन रॅली काढून कोर्ट नाका येथील राघोबा मंदिर येथील सभागृहात जाहीर सभा होणार आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २६ नोव्हेंबर १९४९ या दिवशी तत्कालीन राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांना देशाची घटना सादर केली होती. त्यानंतर २६ जानेवारी १९५० या दिवसापासून भारत हा प्रजासत्ताक देश झाला.
संविधान दिनाचे स्मरण करण्यासाठी शेकापने माजी आमदार विवेक पाटील यांच्या नेतृत्वाखाली या गौरव रॅलीचे आयोजन केले आहे.