नवे १०२७ रुग्ण; दैनंदिन वाढ दुपटीपेक्षा अधिक

Voting in second phase lower than expected in Vidarbha lok sabha election 2024
मतटक्क्याला झळा! विदर्भात दुसऱ्या टप्प्यात अपेक्षेपेक्षा कमी मतदान
Pune records highest temperature in April in eleven years
पुण्यात अकरा वर्षांतील एप्रिलमधील सर्वाधिक तापमानाची नोंद; तापमानाचा आलेख कसा चढा राहिला?
mumbai records hottest temprature in 10 years
मुंबईतील दहा वर्षांतील सर्वाधिक तापमानाची नोंद; मुंबई, ठाणेकरांची आजही होरपळ
March 2024, March 2024 Records Hottest Temperatures, March 2024 Records Hottest in 175 Years, hottes march 2024 globally, Global Average Temperatures Up by 1.35°C, heat, summer march, summer season
यंदाचा मार्च आजवरचा सर्वांत उष्ण; पश्चिमी झंझावाताचा भारताला दिलासा

नवी मुंबई : गेली आठ दिवस शहरात करोना रुग्णांचा आलेख प्रचंड वाढत असून मंगळवारी १०२७ रुग्ण सापडले. सोमवारी ४९१ रुग्ण होते. यात ५३६ रुग्णांची एका दिवसात भर पडून दुप्पट वाढ झाली आहे. शहरात समूह संसर्गाची शक्यता पालिका आयुक्तांनी वर्तवली आहे. यामुळे शहराची चिंता वाढली असून आरोग्य व्यवस्थाही तोकडी पडण्याची शक्यता आहे.

शहरात करोनाच्या दुसऱ्या लाटेत एका दिवसातील आतापर्यंत सर्वाधिक रुग्ण १४४१ इतके होते. २८ डिसेंबर रोजी शहरात दैनंदिन करोना रुग्णांची संख्या ८३ इतकी होती. ती सहा दिवसांत २ जानेवारी रोजी ५२३ पर्यंत पोहचली होती. सोमवारी ४९१ रुग्ण सापडले होते. मात्र मंगळवारी शहरासाठी धोक्याची घंटा वाजली असून एका दिवसात १०२७ रुग्ण सापडले आहेत.

शहरात ओमायक्रॉन रुग्णांची संख्या दहा झाली असून गेली काही दिवस यात वाढ नाही. मात्र करोना रुग्णांत मोठी वाढ होत असल्याने पुन्हा एकदा शहराला करोनाचा विळखा पडला आहे. दुसऱ्या लाटेपेक्षा संसर्ग मोठा असल्याने उपचाराधीन रुग्ण २५ हजारांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.

उपचाराधीन रुग्ण तीन हजार पार

मंगळवारी शहरात करोनाचे १०७२ नवे रुग्ण सापडल्याने उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. ३४०४ इतके रुग्ण उपचाराधीन झाले आहेत. न्शहरात करोनाचे एकूण रुग्ण १ लाख १३ हजार ४९३ पर्यंत गेले आहेत.  

शहरातील मंगळवारचे रुग्ण

बेलापूर २२८ ल्लनेरुळ  १६६

वाशी १४३   तुर्भे  ९७

कोपरखैरणे ११४ ल्ल घणसोली १८३  ल्ल ऐरोली १०५

दिघा ३६ एकूण १०७२

नवी मुंबई शहरात दररोज वाढणारी रुग्णांची संख्या पाहता हा समूह संसर्गच असल्याचा अंदाज आहे. दररोज नवे रुग्ण वाढत असून दुसऱ्या लाटेपेक्षा नवे रुग्ण, उपचाराधीन रुग्ण दुपटीने वाढतील या दृष्टीने पालिका तयारी करत आहे. नागरिकांनीही काळजी घ्यावी व नियमांचे पालन करावे. – अभिजीत बांगर, आयुक्त, महापालिका