scorecardresearch

Premium

अवैधरित्या भारतात प्रवेश करून राहत होते दाम्पत्य, दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई…

नवी मुंबईतील उलवा परिसरात राहणाऱ्या एका दाम्पत्याविरोधात पारपत्र कायद्यांतर्गत गुन्हा नोंद करून कारवाई  करण्यात आली आहे.

couple was living in India illegally anti-terror squad action
इमरूल नूर मोहम्मद मुल्ला आणि लोसामी मुल्ला अशी यातील आरोपींची नावे आहेत. (फोटो- लोकसत्ता टीम)

नवी मुंबई: मंगळवारी नवी मुंबईतील उलवा परिसरात राहणाऱ्या एका दाम्पत्याविरोधात पारपत्र कायद्यांतर्गत गुन्हा नोंद करून कारवाई  करण्यात आली आहे. हे दाम्पत्य २०२१ मध्ये अवैधरित्या भारतात आले व तेव्हापासूनच उलवा येथे राहत होते. यातील महिलेचा शोध पोलीस घेत आहेत. 

इमरूल नूर मोहम्मद मुल्ला आणि लोसामी मुल्ला अशी यातील आरोपींची नावे आहेत. हे नवरा बायको असून मूळ पारंबो बाग तालुका कालिया जिल्हा नराईल, बांदलादेश येथे राहणारे आहेत. सोमवारी दुपारी आरोपींबाबत दहशतवाद विरोधी पथकाला माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारावर उलवा परिसरात त्यांचा शोध सुरु केला गेला.

Manoj Jarange Patil assured the High Court that the agitation will be carried out in peaceful way
आंदोलन सर्वतोपरी शांततापूर्ण मार्गाने करणार, मनोज जरांगेंची उच्च न्यायालयात हमी
mumbai municipal corporation marathi news, mumbai 48000 illegal hoardings marathi news
मुंबईत गेल्या वर्षभरात ४८ हजार बेकायदा फलकांवर कारवाई, गुन्हा मात्र २२ प्रकरणांतच; कारवाईतील तफावतीवर उच्च न्यायालयाचे बोट
narendra modi
भारत-म्यानमारच्या सीमेवर बांधणार तब्बल १६०० किमीचं कुंपण, मोदी सरकारचा निर्णय
Posting objectionable content
‘सोशल मीडिया’वर आक्षेपार्ह मजकूर टाकणे सहायक फौजदाराला भोवले…

आणखी वाचा-पाणवठे नष्ट व कोरडे झाल्याने उरणमध्ये येणाऱ्या परदेशी पक्ष्यांची संख्या रोडावली?

त्यावेळी दोघेही सेक्टर १९ मधील शगुन इमारतीत राहत असल्याची माहिती मिळाली. त्या अनुशंगाने सदर ठिकाणी जाऊन मुल्ला याला पोलिसांनी ताब्यात घेत चौकशी केली असता तो मूळ बांदलादेशी असल्याची त्यांनी कबुली दिली. २०२१ मध्ये त्यांनी भारतात अवैधरित्या प्रवेश केला होता. तेव्हापासून ते उलवा परिसरात राहून बिगारीचे मिळेल ते काम करीत होता. मुल्ला हा परांची बांधण्याचे काम करतो तर त्याची पत्नी लोसामी ही नेरुळ परिसरात घरकाम करते. भारतात बेकायदा वास्तव्य दरम्यान त्यांना एक मुलगी झाली आहे. लोसामी अद्याप पोलिसांच्या हाती लागली नसून तिचा शोध सुरु आहे.  

Latest Comment
View All Comments
Post Comment

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Couple was living in india illegally anti terror squad action mrj

First published on: 05-12-2023 at 14:24 IST

आजचा ई-पेपर : नवी मुंबई

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×